संतांचा सहवास

डॉ. दीपक शिकारपूर
मंगळवार, 17 जुलै 2018

भारतीय संस्कृतीत सत्संगाला महत्त्व देण्यात आले आहे. मलाही दोन संतांचा सहवास लाभला.

आपण थोर संतांची चरित्र वाचतो व त्यांच्या शिकवणी आचरणात आणायचा प्रयत्न करतो. सध्या समाजात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाल्याने खरा संत कोण हे ठरवणंही अवघड होत चाललं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला दोन संतांचा सहवास लाभला. दुर्दैवाने दैवत्वाला पोचलेल्या ह्या दोन्हीही व्यक्ती आता हयात नाहीत. कदाचित देव लोकांतही संतांची उणीव भासत असल्याने त्यांना इहलोकातून मुक्ती मिळाली असेल.

सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी एका समारंभासाठी अब्दुल कलाम पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी पाचएक मिनिटे गप्पा मारायचा योग आला होता. नंतर सहा वर्षांपूर्वी एका शैक्षणिक प्रकल्पाच्या चर्चेसाठी त्यांची वेळ मागितली व त्यांनी मी पुढच्या वेळी पुण्याला आल्यावर भेटेन, असा विश्वास दिला होता. त्यानुसार त्यांना पुन्हा भेटायची संधी मिळाली. सर्किट हाउसमध्ये रात्री साडेबारा वाजता आमची भेट होती. अगदी प्रसन्न चेहऱ्याने ते भेटले होते. आमच्या भेटीनंतर अजूनही काही व्यक्तींना भेटले होते. त्या वेळी सत्तरी ओलांडलेला हा तरुण पहाटे चार वाजता उठून अभ्यास करत असे.

गेल्या चार वर्षांत दादा वासवानींना प्रत्यक्ष भेटायचा व त्यांचे विचार ऐकायचा चार वेळा योग आला होता. सतत हसतमुख, कायम दुसऱ्याला काहीतरी द्यायचा त्यांचा यत्न असे. समोरच्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन अतिशय सोप्या भाषेत ते संवाद साधत असत. ह्या दोन्ही संतांना भेटून आल्यावर एक वेगळाच प्रत्ययकारी अनुभव आला होता. ते स्वतःला संत व देवाचा अंश वगैरे समजत नसत. उपलब्ध वेळ समाजासाठी देण्यात त्यांची उभी हयात गेली. अशा व्यक्तींच्या जाण्याने खरोखर पोकळी निर्माण झाली ह्या वाक्‍याचा खरा अर्थ समजतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr deepak shikarpur write article in muktapeeth