
शोध..! शोध हा शब्द फक्त दोन अक्षरी मात्र त्याचा अर्थ अथांग आहे. ज्याला कसलीही मर्यादा नाही, तुझ्यासाठी सारे मार्ग सदैव मोकळे. सृष्टीच्या निर्मितीनंतर झालेले परिवर्तन हे वेगळे शोधाची प्रचिती देणारे आहे. अश्मयुगातील मानव आणि आजचा मानव व भविष्यकालीन प्रजाती यांच्यामध्ये आपणास अनेक बदल झालेले दिसतात. अशाच प्रकारचे अनेक बदल आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बघत असतो अगदी नवनवीन घडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण अनुभवतो. हे सारे बदल गरजेनुसार असतात. हे सारे चित्र बघत असताना आपल्याला "गरज ही शोधाची जननी आहे' या वाक्याची अनुभूती येते.
ग्रामीण भाग हे संशोधनाचे उगमस्थान आहे आणि अशाच वेगवेगळ्या संशोधनाला तथा संशोधकांना चालना देण्याकरिता शिक्षण महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. आज आपण अशाच एका शाळेबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील "झी माउंट लिटेरा' या शाळेत करण्यात आला.
प्रायोगिक तत्त्वावर आधारित शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ठरतो आहे. या शाळेमध्ये प्रत्येक आठवड्यात प्रायोगिक शिक्षक विद्यार्थ्यांना दिला जाते. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशाच एका प्रयत्नातून तयार झालेले एक संशोधन इयत्ता सहावीच्या 16 विद्यार्थ्यांच्या चमूने केलेले आहे.
काही वर्षांत राज्याला पाणीटंचाईची झळ सोसावी लागली आहे, ही झळ पुसद येथील विद्यार्थ्यांनीदेखील जाणवली आणि प्रायोगिक शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमात असलेल्या "केपिलरी ऍक्शन' (Capilary Action) या संकल्पनेचा विचार करून तेथील विद्यार्थ्यांनी संशोधन केले. ज्यामुळे रोपटे किंवा वृक्षाला आपोआप पाणी दिले जाऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी झाडाच्या बाजूला एक सहा फूट उंचीचा आणि चार ते सहा इंच व्यास असलेला पाइप जो किमान तीस लिटर पाणी साठवून ठेवू शकतो, याची मांडणी केली. यामध्ये पाण्याच्या मोजणीकरिता एक पारदर्शक छोटा पाइपसुद्धा बसविण्यात आला आहे. या प्रयोगामध्ये सलाइनप्रमाणे हवे तेवढे पाणी घेता येते, अशी एक व्यवस्थासुद्धा केली आहे. ज्याला आपण Dripping System असे म्हणतो. या उपकरणामध्ये विद्यार्थ्यांनी एका सुती दोरीचा वापर केलेला आहे जेजुरी मातीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी पोहोचवण्याची क्षमता असते. ज्याप्रमाणे दिव्यातील वात तेल शोषून घेते. या उपकरणामुळे झाडाला दहा दिवसांपर्यंत पाणी देण्याची गरज नाही. असे उपकरण जागोजागी लावले झाडांना पाणी देण्याकरिता लागणारा दररोजचा टॅंकरचासुद्धा खर्चदेखील वाचू शकतो.
विशेष म्हणजे 26 जानेवारी 2020 रोजी या संकल्पनेसाठी पेटंट रजिस्टर करण्यात आले असून, यात खालील 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अक्षय मनोहर, देवयानी दुर्वे, ईश्वरी राणे, माही निर्मळ, आतिफ भुरा, पीयूष तुपोने, राधा जाधव, संस्कृती बोम्पिलवर, सार्थक पवार, श्रावणी तगडपल्लेवर, तम्ही खान, तनुश्री आबोडे, उन्नती देऊळकर, साहिल पॉल, हर्ष कदम, स्नेहल नापटे.
आता विचार करा मित्रहो, प्रयोग शिक्षणाच्या आधारावर विद्यार्थ्यांना अशाप्रकारे चालना मिळू शकते, या प्रकाराच्या शिक्षणाची गरज समाजाला किती आहे. अशा संकल्पनांचा आधारस्तंभ होण्याचे कार्य नागपूर येथील एक सामाजिक संस्था "ज्ञान फाउंडेशन' अगदी यशस्वीरीत्या करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.