स्पर्धा जगताना

मधुरा धायगुडे
मंगळवार, 26 मार्च 2019

सकाळी अगदी उत्साहात गेलेली "वीणा' संध्याकाळी अगदी निराशेने परतली. तिची आज गाण्याची स्पर्धा होती, स्पर्धेत काय झालं? हे तिच्या चेहऱ्यावर वाचता आलं मला! तिच्या डोळ्यांत अश्रू आले अन्‌ ती म्हणाली, किती वेळा हरायचं मी? मी पटकन म्हणाले जिंकेपर्यंत? ती पटकन खुदकन हसली, ठीक आहे, उद्यापासून पुन्हा नवा रियाज.

सकाळी अगदी उत्साहात गेलेली "वीणा' संध्याकाळी अगदी निराशेने परतली. तिची आज गाण्याची स्पर्धा होती, स्पर्धेत काय झालं? हे तिच्या चेहऱ्यावर वाचता आलं मला! तिच्या डोळ्यांत अश्रू आले अन्‌ ती म्हणाली, किती वेळा हरायचं मी? मी पटकन म्हणाले जिंकेपर्यंत? ती पटकन खुदकन हसली, ठीक आहे, उद्यापासून पुन्हा नवा रियाज.

मी वीणाला म्हणाले, स्पर्धा म्हणजे केवळ जिंकण्याची तयारी नाही, तर हारण्याचीही तयारी असते. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. मी तिला विचारलं, जिंकणाऱ्याचे अभिनंदन केले का? ती पटकन "हो' म्हणाली. स्पर्धा सुरू असेपर्यंतच हार जीतची जाणीव, नंतर निखळ मैत्री असतेच. स्पर्धा या मनाने मोठं होत जाण्यासाठीही असतात. फक्त स्टेजवर जाऊन घेतले जाणाऱ्या पदकाला बक्षीस म्हणावे का तर नाही, अनुभवाने समृद्ध होत जाणाऱ्या जाणिवादेखील बक्षिसांचे एक रूपच आहे.

बालपणापासून कोवळ्या वयात आपण फक्त जिंकण्याचे संस्कार करत असतो, हीच रुक्षता बालपणातून तारुण्यात पाऊल टाकत असते. निर्मळ, निकोप तारुण्याचा सराव हा बालपणापासूनच होत असतो. स्पर्धा म्हणजे ठराविक कालावधीत गाठलेले "लक्ष्य' आणि ते गाठण्यासाठी होते जीवघेणी "स्पर्धा'. एकच फायदा या स्पर्धांमुळे होतो तो म्हणजे वेळेचे मोल समजते. आपल्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी या स्पर्धा पाऊलवाटांसारखे काम करतात. स्पर्धेमध्ये पोचेपर्यंत वाढीस लागलेली जिद्द, आत्मविश्‍वास, एकाग्रता स्वतःचं स्थान निर्माण करण्याची पाहिलेली स्वप्ने ही या स्पर्धांमुळेच निर्माण होते आणि तीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असते. आयुष्य संघर्षमय आहे, त्यातील असंख्य जीवघेण्या प्रसंगांना तोंड देण्याची सुरवात या स्पर्धेद्वारे बालपणीच होते. जो प्रवाहाबरोबर वाहत जाईल तोच पुढे जाईल ही जाणीव स्पर्धेमुळे निर्माण होते. त्यासाठी भरपूर वाचन, ऐकणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhura dhaygude write article in muktapeeth