आला दारी वासुदेव (मुक्तपीठ)

सुरेखा सुहास जोग
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पहाटप्रहरी गाणी गात, नाचत वासुदेव दारी यायचा. `दान पावलं गं` गाता गाता भविष्य सांगायचा. 

पहाटप्रहरी येई दारी वासुदेवाची स्वारी. हाती चिपळ्या घेऊन नाचत ठुमकत गाणे गात यायचा. दान दिले की दात्याचे भविष्य सांगायचा. एकदा काय झाले, आमच्या एका नातेवाइकाचे लग्न होते. मी माझी तयारी करत असताना त्या खोलीत माझ्या कानातला झुमका पडला.

मी खूप शोधला त्या रूममध्ये; पण मिळालाच नाही. मी खाली आले तर दारात वासुदेव उभाच. ‘‘ताई, तुमची हरवलेली वस्तू मिळणार, पण आज नाही, उद्या सांजवेळी चार वाजता बाहेर रस्त्यावर मिळणार.’’ मला हसू आले. कारण माझा झुमका घरात आतल्या खोलीत पडला होता.

तो गेल्यावर मी लग्नालाही जाऊन आले. विसरूनही गेले होते वासुदेवाला; पण खरंच, दुसऱ्या दिवशी चार वाजता रस्त्यावर माझा झुमका मिळाला. माझ्या साडीच्या निऱ्यांमध्ये अडकून बसला होता. मी बाहेर आले तेव्हा तो झुमका खाली पडला असावा. मला खूप आनंद झाला. कारण माझ्यासाठी तो स्पेशल होता.

माझा दीड वर्षाचा मुलगा पुष्कर बाहेर आला. तेव्हा हे वासुदेव दारातच होता. त्याला पाहून म्हणाला, ‘‘याचा चार दिवसांनी मोटार अपघात होणार, पण काळजी करू नका, तो अपघात त्याचा जीव वाचवणार.’’

मी त्याच्यावर इतकी चिडले, ‘‘जा रे बाबा तू, माझे डोक खाऊ नकोस.’’ तरीसुद्धा काळजी म्हणून त्याला बाहेरच पाठवले नाही. घरी खेळता खेळता पुष्करने शिश्‍याची गोळी नाकात घातली. ती इतकी आत गेली की तो बेशुद्ध पडला. डोळेच उघडेना. डॉक्‍टर म्हणाले, ‘‘छोटीशी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढावी लागेल.

मी पुष्करला रिक्षात झोपवून रुग्णालयाकडे निघाले.  नळस्टॉपपाशी ब्रेक लावल्यामुळे तीन कार जोरात मागून रिक्षेवर आदळल्या. पुष्करला इतक्‍या जोरात धक्का लागला की त्याच्या नाकातली गोळी बाहेर पडली. तो शुद्धीवर आला. मनापासून त्या वासुदेवाचे आभार मानले.

Web Title: Muktapeeth article by Surekha Jog