फुलांची वाडी

डॉ. नीलिमा राडकर
शनिवार, 20 जुलै 2019

आपलं ओटीभरण झालं नाही तरीही प्रत्येकीसाठी आशीर्वादासह फुलांची वाडी बनवतेय ती. केवढं मनाचं मोठेपण!

आपलं ओटीभरण झालं नाही तरीही प्रत्येकीसाठी आशीर्वादासह फुलांची वाडी बनवतेय ती. केवढं मनाचं मोठेपण!

मैत्रिणीला तिच्या मुलीची फुलांची वाडी भरायची होती. अगदी मोजके, नाजूक फुलांचे दागिने हवे होते. आम्ही ताराबाईंच्या दुकानात गेलो. पूर्वीच्या दुकानाच्या जागी नवीन इमारत झाली होती. त्यांना मोठा गाळा मिळाला होता. आम्हाला बघून ताराबाईंना खूप आनंद झाला. त्यांनी व्यवसाय खूपच वाढवला होता. दुकानात एक तरुणी बसली होती. तिने आम्हाला दागिन्यांचे अल्बम्स दाखवले. त्यातून आम्ही काही दागिने निवडले. मैत्रीण त्यांना म्हणाली, ""ताराबाई, तुम्ही या वेळी नक्की या डोहाळे जेवणाला.'' त्या म्हणाल्या, ""ताई, बघताय ना. खूप कामे आहेत, त्यामुळे सवड होणे कठीण.'' का कुणास ठाऊक, पण त्यांचे डोळे ओलावलेले वाटले. सासूबाईंनी विश्‍वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. आधी सासरे फुले आणून द्यायचे आणि सासूबाई त्यांचे दागिने बनवायच्या. पुढे मी त्यांना मदत करू लागले. माझे दागिने नाजूक व हलके असल्याने तेही आवडू लागले. आम्हा दोघांना लेकरांची लई हौस होती. मला खूप वाटायचे, आपलेही ओटीभरण व्हावे, आपल्यालाही फुलांची वाडी घालून सजवावे. पण ते काही झाले नाही.''

माझ्या सासूबाई म्हणजे देवमाणूस. त्या म्हणाल्या, ""अगं, पोर नाही म्हणून जन्मभर कुढत का बसणार आहेस? त्यापेक्षा आपला हा धंदा इमानाने वाढव. अगं, तू तर लई पुण्याचं काम करतेस. तुज्यामुळे गरबारशी बाईचं ओटीभरण आनंदानं साजरं होतं.'' सासूबाईंच्या बोलण्याने मला धीर आला. त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मी फुलांचा धंदा खूप वाढवला. ताई, लहान लेकरांचा पाळणा सजवताना फुलांमध्ये आळीजाळी नाही ना ते मी नीट बघते. गरबारशी बाईला उग्र वासाची फुलं मी वापरत नाही. ही माझ्या पुतण्याची बायको. हीच औटीभरणं मी हौसेनं केलं. आता ती मला मदत करते. गरबारशीची वाडी टोपलीत भरताना मी देवाकडे प्रार्थना करते, देवा हिची सुखरूप सुटका कर. हिला आणि हिच्या लेकराला सुखी ठेव.''
त्यांची आशीर्वादाचा गंध असलेली फुलांची वाडी नेहमीपेक्षा प्रसन्न आणि सुगंधित वाटली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr neelima radkar