अपराधी मन

मिलिंद दिवाकर
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

व्यसनामुळे माणूस काय काय गमावतो! व्यसनातून मिळते केवळ दुःख आणि वाट्याला येते अपराधीपण.

व्यसनामुळे माणूस काय काय गमावतो! व्यसनातून मिळते केवळ दुःख आणि वाट्याला येते अपराधीपण.

गर्दच्या नशेपोटी माझं घर उद्‌ध्वस्त झालं होतं. मी भिकाऱ्यासारखा रस्त्यावर राहत होतो. नशेसाठी भीक मागत होतो. लांडीलबाडी, फसवाफसवी, चोरी, गुन्हेगारी हेच आयुष्य झालेलं. अपमान, घृणा, तिरस्कार करत होते सर्व माझा. एक शापीत जगणं जगत होतो मी. पाच रुपयांच्या विश्‍वासासाठीही पात्र नव्हतो मी. पण आज... व्यसनमुक्त जीवन जगताना एक असीम शांती, समाधान लाभतं आहे. पाच रुपयेही मला कोणी देत नसतं. तेच मला आज चांगल्या कामासाठी कोणी तरी न मागता माझ्या वागण्यावर विश्‍वास ठेवून मोठी रक्कम माझ्या हवाली करतं. पाटीलसाहेब निरोप घ्यायला उठले, तर मला काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. निरोप द्यायला उठलो. पाटीलकाकांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकणार तोच त्यांनी मिठी मारली. क्षणभर त्यांच्या मिठीत वडिलांच्या मिठीत शिरल्यासारखं वाटलं मला. ‘‘आधी का नाही लिहिलंस रे तू? एक वर्षभर आधी जरी लिहिलं असतंस ना...!’’ पाटीलसाहेबांनी बोलणे अर्धवटच सोडले. ‘‘का हो काका?’’ ‘‘आठ-नऊ महिन्यांपूर्वी माझा एकुलता मुलगा अल्कोहोलमुळे गेला रे! लिव्हर सिरॉसिस झाला होता त्याला. दोन लहान मुलं आहेत रे, खूप चांगली सून आहे माझी. आम्हा सगळ्यांना सोडून गेला तो.’’ पाटीलकाका गहिवरून सांगत होते.

मी थोडासा गोंधळलो. काय बोलावे कळेना. ‘‘मीच त्याच्या मरणाला कारणीभूत आहे रे! दारू प्यायला कंपनी देत असे मी त्याला.’’ पाटीलकाकांचा पश्‍चाताप स्पष्ट कळत होता. अपराधीपणाची भावना त्यांना माझ्याकडे घेऊन आली होती. ‘‘काका, तुम्ही असं अपराधी का मानता स्वतःला... तुमचा उद्देश काही वाईट होता, असं नाही म्हणता येणार.'' ‘‘मिलिंदा, अरे मला कौन्सिलिंग नको करू. राहू दे मला त्या ‘गिल्ट’मध्ये. आयुष्यभर ही अपराधी भावना जपतच जगायचं मला आता. चल, निघतो मी. तू हे काम सुरूच ठेव. अनेक कुटुंबाना गरज आहे. आणि बरं का मी दारू पिणं सोडलंय आता.’’ पाटीलकाकांनी निरोप घेतला.
मनात आलं की, आपल्याला खूप काम करायचंय. पूर्ण श्‍वास घेत नव्या ऊर्जेनं मी कामाला सुरुवात केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by milind diwakar