शिल्प आणि शिल्पकार

स्नेहा विवेक आगाशे
Saturday, 11 January 2020

आसपासच्या अनेक गोष्टींचे संस्कार आपल्यावर होतात खरे; पण आपणच आपल्याला घडवत असतो, हे अधिक खरे आहे.

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ वामनराव पैं यांचे हे सुंदर वाक्य आपल्याला खूप काही शिकवते. एका प्रवासात हे वाक्य माझ्या वाचनात आले व त्याविषयी थोडेसे लिहावेसे वाटले. शिल्पकार शिल्प बनवायला घेतो तेव्हा त्याच्या मनामध्ये त्या शिल्पाविषयीचे चित्र तयार असते. आता त्याला ते चित्र आपल्या कलाकृतीतून प्रत्यक्षात साकारायचे असते. त्याला शिल्प घडवायला घेतल्यावर प्रत्यक्षात जसेच्या तसेच शिल्प घडवायला अनेक अडचणी येतात.

शिल्पाला मूर्त रूप येण्याकरिता त्या वेळची मानसिक स्थिती, भोवतालची परिस्थिती व परमेश्वराची साथ हेपण तितकेच महत्त्वाचे असते. शिल्प घडविताना काय घ्यायचे व काय सोडायचे याचा सखोल अभ्यास त्याला करावा लागतो. त्याचे त्या वेळचे भाव शिल्पामधे उतरलेले आपल्याला जाणवतात.

तसेच आपल्या जीवनाचे पण..! परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आपण आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग निवडायचा असतो. आपल्या संपर्कामधे येणाऱ्या व्यक्तिंमधील गुण किंवा दोष आपण काय घ्यायचे व काय सोडून द्यायचे हे नक्की ठरविले तर आपले जीवन नक्कीच सुकर होते. सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या सकारात्मक असोत वा नकारात्मक; त्याचा परिणाम आपल्यावर किती करून घ्यायचा हे आपल्याच हातात आहे. तसेच आहाराचे पण... सात्त्विक, राजसी किंवा तामसी आहार सेवन करू तसे आपले विचार बनत जातात. त्यामुळे मला असे वाटते शिल्पकाराला जसे उत्तम शिल्प बनविण्याचा ध्यास असतो व त्याकरिता तो प्रयत्नशील असतो, त्याप्रमाणेच आपण आपले जीवनरूपी शिल्प उत्तमोत्तम बनवायचा प्रयत्न करणे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. परमेश्वराची कृपा व साथ प्रत्येकाला असतेच, फक्त आपण त्याची जाण व श्रद्धा ठेवणे तितकेच आवश्यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sneha aagashe