जिम कॉर्बेटचे जंगल

muktapeeth
muktapeeth

सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही.

नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून हिरव्यागार अस्सल जंगलात जायला उत्सुक होतो. 31 मार्चला पुणे-दिल्ली फ्लाइट पकडली. पोचल्यावर जेवण करून पुरानी दिल्लीला गेलो. रामनगर हे जिम कॉर्बेटच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

पुढील पाच दिवस जिम कॉर्बेटमध्ये जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी होते. जिम कॉर्बेट हे सर्वांत जुनं, 1936 मध्ये स्थापित झालेलं राष्ट्रीय उद्यान आहे. हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे. उद्यानाचं नाव जिम कॉर्बेटच्या नावावर ठेवलं आहे. त्यांच्यासारख्या माणसाला वाहिलेली ही खरी श्रद्धांजदली. ते निष्णात शिकारी तर होतेच, शिवाय उत्तम लेखक, फोटोग्राफर व जाणते पर्यावरणरक्षकही होते.

हे मुख्यतः साल वृक्षांचं वन आहे. 40-50 फुटी उंचच उंच झाडं तिथे दाटीवाटीनी उभी आहेत. जिपने जाताना असं वाटतं की आपण त्यांच्या हिरव्या कमानीतून जात आहोत. शिवाय इथे कढीपत्ता, जांभूळ, हल्दु, आवळा, बेल व आंबा या वृक्षांची पण रेलचेल आहे. इतक्‍या सर्व हिरव्या वृक्षांमध्ये एक लालभडक वृक्ष सर्वांचं लक्ष वेधून घेतो. त्याचं नाव कुसूम. हे जंगल फुलांनी पण डवरलेलं आहे. बरंच काही पहायला मिळालं. हरिणांचे मोठ्ठाले कळप, हत्तींचा कळप होते. त्यात पिलू हत्ती इतके गोड दिसत होते की नजर दुसरीकडे वळतच नव्हती.

या पार्कचं आणखी एक वैशिष्ट्य जे अधोरेखित करावंसं वाटतं ते म्हणजे प्लॅस्टिकमुक्त जंगल. जशीच जिम कॉर्बेटच्या गेटमध्ये एन्ट्री घेतो, जीप थांबवली जाते, तेव्हा 50 रुपये प्रवेश शुल्क घेऊन जूटची एक थैली देतात. तिथल्या स्टेमध्ये तुम्ही जो कचरा कराल तो या पिशवीत भरून आणायचा. तिथले कर्मचारी पण हा नियम काटेकोरपणे पाळतात म्हणून प्लॅस्टिकचा राक्षस तिथे बोकाळलेला नाही. ही सर्वात जमेची बाजू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com