बकुळीची फुले (मुक्तपीठ)

बकुळीची फुले (मुक्तपीठ)
Updated on

माझी आई कोकणात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. ‘कळंबणी’ या छोट्याशा खेड्यात ती होती. झोपडीवजा घरात तिचा संसार. एप्रिल-मे असावा. एका रात्री तिला घरातच बकुळीच्या फुलांचा वास येऊ लागला. दुसऱ्या दिवशी तिच्या घराजवळच येण्या-जाण्याच्या वाटेवर बकुळीच्या फुलांचा सडा पडलेला दिसला. माझे लग्न झाल्यावर जेव्हा मी काही दिवसांसाठी गेले, तेव्हा तिने मला हे सर्व सांगून झाडही दाखवले. माझे लग्न होऊन पुण्यात आल्यावर कधीतरी बकुळीचे गजरे विकणारा दिसला की मी लगेच विकत घेऊन केसात माळत असे. शनिवारवाड्यात बकुळीची झाडे आहेत. मी नेहमी या झाडांच्या शोधातच असते. प्रतिमा मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बकुळीचे झाड आहे. शिवाय मोठ्या रस्त्याच्या पलीकडील पदपथावरही झाड आहे. या हंगामात फुले येतात आणि ती वाऱ्याच्या झोतबरोबर विशेषतः सकाळी व सायंकाळी पडतात. मी ती खाली वाकून गोळा करतेच. संध्याकाळी चालायला जात असताना आणखी दोन झाडांचा शोध लागला. मग काय आणखी फुले, आणखी आनंद. 

आमच्या शेजारच्या बंगल्यातील बाईंनाही फुलांचे वेड. त्यांच्या सुनेने बकुळीचे कलम रस्त्याच्या बाजूला आमच्या व त्यांच्या सामाईक भिंतीजवळ लावले. तीन- चार वर्षांनी त्या झाडाला कळ्यांचे घोस दिसू लागले. प्रथमच मी बकुळीच्या कळ्या पाहिल्या. त्या किती नाजूक असतात हे जवळून पाहायला मिळाले. त्या केव्हा, कशा फुलतात, केव्हा फूल होऊन गळते याचे निरीक्षण सुरू. सकाळी, संध्याकाळी वारा आला की ती फुले पडू लागत व मी गोळा करू लागले. अगदी अलीकडे ठाण्याला माझ्या मावस भावाकडे गेले होते. त्यांच्याकडच्या गड्याने बकुळीची भरपूर फुले आणली. मी म्हटले, ‘आता कशी ही फुले? आणि एवढी!’ मी ती खूप फुले पाहून अगदी हरखूनच गेले. लगेच गजरा ओवून माळलादेखील. इतका माझा फुलांबाबतचा हावरटपणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com