मोठा देव्हारा

नरेंद्र धायगुडे
बुधवार, 27 मार्च 2019

"फुलायचं' हा झाडाचा धर्म असतो. पाणी कोण घालतो याची त्यांना आस नसते, फुलं-फळं कोण नेतो याची त्यांना खंत नसते.

सकाळची वेळ कशी उत्साहाने भरलेली असते. आजी-आजोबा, काका-काकू व इतर बरेच जण प्रसन्न चित्ताने प्रभात फेरीस जात असतात. काही जण देवभक्त असतात. मोबाईलवरची भक्तिगीते ऐकत जातात. जाता जाता दिसतील त्या झाडांची फुलं काढीत जातात. हाताला आली नाहीत तर काठी असतेच. पण देवाला भावभक्तीने फुले वाहायलाच हवीत. त्यामुळे सकाळी फारच प्रसन्न वाटतं!

आमचे घर एका खूप रहदारीच्या रस्त्यावर आहे. आम्ही हौसेने कुंपणालगत जास्वंदीची काही झाडं लावली आहेत. घराच्या गच्चीतही फुलझाडे वाढवली आहेत. घरातील छोट्या देव्हाऱ्यातल्या देवांसाठी आणि थोडीफार गजऱ्यासाठी फुले येतात. तेवढी पुरतात. फुलपुडा कधी विकत आणावा लागत नाही. "फुलायचं' हा झाडाचा धर्म असतो. पाणी कोण घालतो याची त्यांना आस नसते, फुलं-फळं कोण नेतो याची त्यांना खंत नसते. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक फूल त्यांना देवानेच दिलेले असते. ते परत देवालाच द्यायचे असते. आपण मात्र त्या झाडावर मुलासारखे प्रेम करतो आणि गुलामासारखा हक्कही बजावतो. "मी पाणी घालतो, मग फुले पण मीच घेणार' हे स्वामित्व मनात भिनतं. दुसऱ्याने फूल तोडले की मग प्रसन्न सकाळ वादावादीत जाते.

नेहमीप्रमाणे सकाळी कुंपणालगत जास्वंदीला पाणी घालत होतो. एका काकूंनी जाता जाता माझ्याच समोर फूल तोडले आणि मला बजावले ""देवासाठी घेऊन जातेय होऽ!'' .. देवाचे काम म्हटलं म्हणजे ते पवित्रच असतं! ... क्षणभर मला काकूंना चांगला उपदेश करावा असे वाटले. पण विचार केला, की जाऊ दे, हेही फूल देवालाच जाणार आहे. काकू ते जास्वंदीचे फूल बाजारात नेऊन विकणार नव्हत्या आणि डोक्‍यात तर नक्कीच घालणार नव्हत्या. मग मी माझ्या मनातला देव्हारा मोठा केला आणि त्यात काकूंचेही देव बसवले. आता कुंपणावरच्या जास्वंदीची फुले मी सहसा तोडत नाही. ज्याच्या हाताला येतात तो ती मोठ्या देव्हाऱ्यातल्या देवांसाठी घेऊन जातो. माझी सकाळ प्रसन्न राहते.

Web Title: narendra dhaigude write article in muktapeeth