भारावलेले 'ते' दिवस निघून गेले!

प्रगती कोलते-भारंबे
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मी साधारण कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. तेव्हा नुकत्याच कॉलेजला सुटट्या लागल्या होत्या. घरी बसून तरी काय करावे? या विचारामुळे मी एमएस-सीआयटीचा क्‍लास लावला होता. क्‍लास घराच्या जवळच अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर होता. सकाळच्या बॅचला जागा शिल्लक नव्हती. नाईलाजाने भर दुपारची साडे तीनची बॅच मिळाली. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य बऱ्यापैकी तापलेला असायचा. सुट्ट्यांमध्ये घरी असल्यावर दिवसभर तोंडाची मशीन चालू असायची. त्यात आई उन्हाळी फराळ बनवत असायची. मग काय! भरपेट पोटपूजा झाल्यावर सुस्तीचे आगमण तर होणारच होते. आधीच उशिरा उठायचं; मग त्यात आरामात नाश्‍ता, जेवण कधी 3.30 वाजायचे कळयाचेच नाही.

मी साधारण कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. तेव्हा नुकत्याच कॉलेजला सुटट्या लागल्या होत्या. घरी बसून तरी काय करावे? या विचारामुळे मी एमएस-सीआयटीचा क्‍लास लावला होता. क्‍लास घराच्या जवळच अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर होता. सकाळच्या बॅचला जागा शिल्लक नव्हती. नाईलाजाने भर दुपारची साडे तीनची बॅच मिळाली. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य बऱ्यापैकी तापलेला असायचा. सुट्ट्यांमध्ये घरी असल्यावर दिवसभर तोंडाची मशीन चालू असायची. त्यात आई उन्हाळी फराळ बनवत असायची. मग काय! भरपेट पोटपूजा झाल्यावर सुस्तीचे आगमण तर होणारच होते. आधीच उशिरा उठायचं; मग त्यात आरामात नाश्‍ता, जेवण कधी 3.30 वाजायचे कळयाचेच नाही. पोटभर जेवण केल्यावर इतके डोळे जड व्हायचे म्हणुन सांग. दुपारच्या साखर झोपेचा मोह सुटायचा नाही. पटकन घड्याळावर एक नजर फिरवायची किती वेळ आहे. बघतच अथंरूणाच्या दिशेने जायचे. बऱ्याच वेळा अरे बापरे 3.15 झाले 3.30 ला क्‍लासचला जायच. पटकन पाच मिनीटची छोटीशी झोप घेते मग उठेल असं करत 3.45 होऊ जायचे. आई ओरडून, ओरडून थकून जायची. अगं ऊठ क्‍लासची वेळ झाली. मी आपलं अगं 4 आहे क्‍लास थांब जरा झोपू दे करायचे. मग तरीही मी नाही उठले; तर तिच नेहमीच शेवटचा ठरलेलं. कॉम्प्लिमेंनटरी डॉयलॉग तर बाय डिफॉल्ट असायचा तो ऐकल्यावर तर उठावच लागायचं. तो माझ्या मते सगळ्याच्या कानावरून गेला असावा. खासकरून झोपाळुच्या. तो असा "एक वेळ दगडाला घाम फुटेल पण तुला फुटणार नाही.' अगदीच हद्द झाली तर मग आई बऱ्याच वेळा मुद्दाम वेळ वाढवुन सांगायची 3.30 झाले असतील 4.00 वाजले सांगायची. मग काय जेव्हा आई म्हणायची 4.00 वाजले तेव्हा मग गाढ झोपेतून ताडकन उठून पळत सुटायचे. रोज उशिरा व्हायचा. रोज बोलणे खायचे आणि मी आपले रोज तेच घिसेपिटे डॉयलॉग सांगायचे. एव्हाना त्या क्‍लासच्या मॅडमला पाट झाले होते. ते असे. "आज दुपारची साखर झोप अर्धा तास लांबली हो!' आणि एकच हशा पिकायचा.

क्‍लासमध्ये सगळे एकाच वयाचे असल्याने बऱ्यापैकी सगळ्यांशी सूत जुळायचे. माझ्या विनोदी स्वभावमुळे बऱ्याच वेळा क्‍लासला मैफिलीचं स्वरूप यायचं. म्हणूनच की काय अल्पावधीतच माझा फॅन फॉलोअर वाढला. त्यातली "ती' एक. आज त्या एका फॅनची ओळख करून देणार आहे. ती माझ्या आधीच्या बॅचला होती. एक दिवस तिला उशीर झाला म्हणून ती माझ्या 3.30 च्या बॅचला आली. माझी नेहमीची बडबड तिच्यासाठी नवीन होती. यापूर्वी इतक पोटधरून आणि डोळ्यातुन अश्रू येईपर्यंत कधी हसले नसल्याचं ती म्हणाली. त्या दिवसानंतर तिने बॅच चेंज करून घेतली. माझ्या 3.30 च्या बॅचला यायला लागली. तेही वेळेवर यायची. माझा स्वभाव तिला भलताच पटला होता म्हणून की कायं माझ्या शेजारच्या डेस्कवर बसायची. आमच्यात जमीन आसमान चा फरक होता. तरीही घनिष्ट मैत्रीचे सूर जुळले. कधी, कसे समजलेच नाही.

दिवस पलटत होते. एमएससीआयटीची ची परिक्षा जवळ आली. आम्ही सोबत प्रॅक्‍टिस करत होतो. त्या दरम्यान चांगली मैत्री झाली. अगदी घरी येण-जाणं सुरू झालं. काका, काकू, तिची मोठी बहीण सगळ्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा. त्यामुळे सगळे जमलो की मस्त मैफिल जमायची. दोन महिन्याचा एमएससीआयटीचा क्‍लास संपला. कॉलेज सुरू झालं. आता पुन्हा गप्पा मारणं, भेटण जमणार नव्हत. कॉलेज, क्‍लास बिझी शेड्युल्ड. त्यात ती सायन्सची विद्यार्थीनी होती आणि मी कॉमर्सची. आमची भेट घडवणारा एमएससीआयटीचा क्‍लास हा केवळ एक योगायोग होता. वाटलं नव्हतं आम्ही पुन्हा भेटू असं. पण एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने भेटू असं ठरविलं होत. क्‍लास मे महिन्यात संपला. त्यानंतर जूनमध्ये माझा आणि जुलै मध्ये तिचा वाढदिवस असतो. म्हणतात ना की ठरवून केलली योजना यशस्वी होत नाही. पण आयुष्यात बरेच साम्य असलेल्या व्यक्ती भेटणारच हे विधी लिखित असावे, म्हणून की काय तिने सरप्राईज बर्थडे पार्टी आयोजित केली. तो दिवस अविस्मरणीय होता. त्यानंतर आम्ही ठरवलं काहीही झालं तरी वेळात वेळ काढून भेटायचं. मग अनेक क्षण आले सण-वार, दिवाळी, शॉपिंग आम्ही भेटत राहिलो.

माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ती माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी होती. त्यामुळे ती मला गाईड करायची. मला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यात रस नव्हता. पण तिने करिअरच्या दृष्टिने गरजेचे आहे हे पटवुन दिले. मग मला पटलं. अस करत मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. संगतचा असर शेवटी दुसर काय! त्यानंतर नामंकित कंपनीत नोकरी केली. तिथे खूप शिकले. माझ्या आयुष्यात खूप गोष्टींनी वळण घेतले होते. आज दोघींचे संसार थाटले.

अरे तिची ओळख करायची राहिलीच! "ती' अतिशय जिद्दी, हट्टी, माझंच खरं करून दाखविणारी थोडी कठोर , थोडी भावुक अशी ही "ती''. माझ्या आयुष्याला यु टूर्न देणारी माझी मैत्रीण आजही तशीच आहे काडी मात्र फरक नाही. तेव्हाही भांडणं व्हायची, आजही होतात. आजही भांडण सोडविण्याचा जिम्मा मीच उचलते. कारण माझ्या पद्धतीने ते शांततेत पार पडतात. मी फोन करून तिला माझ्या घरी बोलवायचे आणि मला बघता क्षणी आजही आपलं भांडण झालं आहे, असं हसू तिच्या चेहऱ्यावर असायचं. मी ती काही बोलणार याच्या आत तिच्या हातात एक कागद ठेवायचे कारण सामोरे आल्यावर माहित असायचं बोलायला मुभा नसणार ते, त्या कागदाला फोल्ड केलेले असायचे आणि आतला मजकूर वाचण्यासाठी तिला पेशन्स ने एक एक फोल्ड ओपन करायला सांगायचे पहिल्या पानावर नेहमीच प्लीज ओपन द पेज विथ स्वीट स्माईल असं असायचं. आणि मग शेवटच्या फोल्डमध्ये माझा विनोदी मजकूर माझी बाजू मांडलेला असायचा. मग राग कुठल्या कुठे निघून जायचा. मग ती खूष होत मलाच वर म्हणायची पुन्हा भांडू नको. आजही झालं भांडण पण ते सोडवायला ते जुने दिवस नाही राहिले फोन करून घरी ये म्हणायला. तो कागदावरच मजकूर शेअर करायला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old days never come back