घरटे

प्रतिभा पतकी
शुक्रवार, 29 मार्च 2019

पक्ष्यांमध्ये जी माया आहे, ती आज माणसांत नाही. पैशांसाठी माणूस आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याला विकतो,

सकाळी गॅलरीत पेपर वाचत बसले होते. वाचता वाचता सहज औदुंबराच्या झाडाकडे लक्ष्य गेले. त्या झाडावर एक मोठं कावळ्याचं घरटं होतं. त्या घरट्यात कावळ्याचं एक पिलू केळफुलाच्या रंगाचं होतं. ते घरट्यांच्या बाहेर चोच "आ' करून बसलं होतं. समोरून एक कावळा येत होता. त्याच्या चोचीत भरवत होता. परत जात होता, परत भरवत होता, असे चार-पाच वेळा झाले.

तेवढ्यात एक आकाशातून हेलिकॉप्टर झाडाच्या दिशेनं मोठा आवाज करून येत होतं. त्या आवाजानं 20-25 कावळे "काव काव' करीत झाडावर जमा झाले. ते हेलिकॉप्टर जाईपर्यंत ते तिथे बसून "काव काव' करीत ओरडत होते. पिलाला काही होऊ नये, यासाठी ते बसले होते. आवाज बंद झाला अन्‌ ते सगळे उडून गेले. मी असा विचार केला. पक्ष्यांमध्येसुद्धा किती एकजूट आहे. आपल्या पिलांच्या रक्षणासाठी ते प्रयत्नशील होते.

आज आपण पाहातो, वाचतो. तीन दिवसांच्या अर्भकाला कचराकुंडीपाशी ठेवले. तीन वर्षांच्या मुलीला बाहेर अनाथ म्हणून टाकून निघून गेले. दोन वर्षांच्या मुलीला एक लाख रुपयाला विकले. पक्ष्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आहे, तो आज माणसांत अभावानेच दिसतो. आज आपल्या बाळाला असं बाहेर ठेवताना त्या आईचं मातृत्व कुठं गेलं? ती प्रेम-माया कुठं गेली? ती आई किती निर्दय झाली? पैशांसाठी माणूस आज वाट्टेल ते करतो. अगदी आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याला विकतो, त्याची दया कुठं गेली? माणूस आज माणसापासून दुरावत चालला आहे. पशु-पक्षी यांच्यामध्ये आस्था आहे, ती आज माणसांत नाही.

असे पाहताना-वाचताना मन विदीर्ण होते. त्या घरट्याकडे पाहताना वाटते; खरंच ते आपल्या पिलाची काळजी किती करतात. आज बुद्धी दिलेल्या मानवाला कळत नाही, असे मला वाटते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pratibha patki write article in muktapeeth