विधीदिन आणि सांविधानिक कर्तव्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधीदिन आणि सांविधानिक कर्तव्ये

विधीदिन आणि सांविधानिक कर्तव्ये

- प्रा.डॉ. आशिष देशपांडे

संविधान रुजू करून ७० वर्षे पूर्ण झाली त्या प्रित्यर्थ २६ नोव्हेंबर हा दिवस ‘विधी दिन ‘म्हणून साजरा होत आहे. भारताचे सामाजिक, आर्थिक ध्येय समोर ठेऊन सर्वसमावेशक , सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीला पूरक असा ‘मापदंड’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दूरदृष्टीच्या थोर विचारवंतांनी केला . २६ नोव्हेंबर १९४९ पूर्वीचे सर्व कायदे तसेच त्यानंतर भविष्यात केंद्र आणि राज्य जे काही कायदे लागू करतील ते ते कायदे संविधानाशी तंतोतंत सुसंगत असायलाच हवेत असा नियम आहे. प्रस्तावना, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, तत्वे, केंद्र आणि राज्य सरकार मधील कायदेमंडळ, मंत्री मंडळ, न्यायव्यवस्था, आणीबाणी, इत्यादी बद्दल ३९५ अनुच्छेद २२ भागात विस्तृतपणे मांडले आहेत आणि १२ शेड्युल्स आहेत.

या विस्तृत आणि सर्वसमावेशक कायद्याची सुरवात 'WE THE PEOPLE OF INDIA’ म्हणजेच 'आम्ही भारतीय ' अशी आहे , म्हणजेच याचा स्रोत कोणी बाहेरील नसून आपण भारतीय आहोत. त्यामुळे आपण रुजू केलेल्या आणि ७० वर्षे पूर्ण करत असलेल्या पवित्र कायद्याचा मानसन्मान राखणेचे भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. भारतीय संविधान हा कणा आहे. तो मजबूत ठेवणे व त्याचे निष्ठेने पालन करणे काळाची गरज आहे.

कोणत्याची व्यवस्थेमध्ये अधिकार आणि कार्यव्ये एका नाण्याच्या दोन बाजू असतात. केवळ आम्हाला संविधानाने दिलेले अमुक असे अधिकार आहेत म्हणून कार्यव्याचा विसर पडत काम नये. सामाजिक सलोख्यासाठी तसेच कायद्याचे रक्षक म्हणून सर्वानी कार्यव्ये पाळावीत. आपल्या सर्वांच्या विचारातून व कृतीतून कर्त्यव्याचे काटेकोर पालन झालेच पाहिजे. कर्तव्ये न पाळता केवळ स्वतः च्या अधिकारासाठी भांडण, हिंसाचार करणे थेट सार्वभौमत्वाला आव्हान करतात. अश्या अपप्रवृत्तीना भारतीय संविधानात जागा नाही. यामुळे ज्या प्रेरणेने आणि हेतूने संविधान रुजू केले आहे, त्याचे वेळोवेळी संवर्धन केले आहे ते संविधान धोक्यात येते. कायदे पाळणे ,त्याचे संवर्धन करणे आणि संविधानिक धर्तीवर असणाऱ्या सर्व कायद्याचे आदराने पालन करून पुढील पिढीकडे तो वारसा देणे सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. फक्त सरकार नाही , तर समाजातील प्रत्येक घटकाने आपल्यापासून सुरवात करून जे काही आपल्या संबधी आहे ती संविधानिक कर्तव्ये पाळावीत तरच या विधी दिनाच्या औचित्याने घेतलेल्या प्रतिज्ञा व विधी दिन साजरा करणेत अर्थ आहे.

आपल्या संविधाची सुरवात 'WE THE PEOPLE OF INDIA’ म्हणजेच आम्ही भारतीय ने झालेली आहे, त्यामुळे समाजातील १०० टक्के व्यक्तीकडून संविधानिक कर्त्यव्याचे पालन झाले तरच 'आम्ही भारतीय ' म्हणून ज्या संविधानाची सुरवात झालेली आहे त्याची निष्ठा राखली जाईल. तसेच ज्यांनी मोठ्या तळमळीने भारताला स्वातंत्र मिळवून देऊन जगभरातील संविधानाचा अभ्यास करून आपल्या भारतभूमीत सर्वसमावेशक आणि जगातील सर्वात मोठे संविधान रुजू केले त्यांचा आदर असेल.

: - प्राध्यापक (डॉ.) आशिष देशपांडे, सिम्बायोसिस विधी महाविद्यालय, पुणे

loading image
go to top