'मुक्तपीठ' म्हणजे 'सकाळ'च्या वाचकांचे हक्काचे व्यासपीठ. तुम्हीही लिहा तुम्हाला आलेले अनुभव, पर्यटनाविषयी, चित्रपटांविषयी अन् या पलीकडेही जे लिहावेसे वाटेल त्यासाठी.
मी पहिलीत होतो, तेव्हा मला बाबांनी नवीन सायकल आणली होती. पहिल्या दिवशी सायकलची पूजा करून मी लगेच सायकल चालवायला निघालो. मला सायकल चालवता येत नव्हती, पण हौस खूप होती. बाबा मला शिकवणार होते. मी त्यांच्याकडून तसं प्रॉमिसचं घेतलं होतं मुळी!