एक चुटकी सिंदुर कि किंमत

sindoor
sindoor

दोघांचेही मित्र-मैत्रिणी टाळ्या वाजवत होते. त्या ने अगदी अभि मानाने एकदा ति च्या कडे आणि एकदा मित्रां कडे पाहि ले. नजरेत जि ंकल्या चा भाव होता. तो ति ला सहन होईना. आणि
तरी तो वि चारतो आहे की काय झाले. उगाचच ति च्या मनात ओळी गुणगुणल्या गेल्या ...
‘खाली हात आया था खाली हात जायेगा....’
लग्नाचे सगळे विधी झाले. आता वरात नि घाली. आई-बाबांच्या डोळ्यात न मावणारे असीम दु:ख त्या नी पापणीवरच थोपवून धरले होते. तिने पण बळे बळे हसत हसत सगळ्यां चा नि रोप घ्या यचा प्रयत्न केला. निघता निघता घाई गडबड, धावपळीत घामाने चेहरा डबडबला. दागिने नकोसे व्हायला लागले. गळ्यातल्या हाराने जीव कचकच करायला लागला.
सगळं बाजूला काढून छान सैलसर ड्रेस घालावा अशी ति ला मनापासून इच्छी होत होती.
‘हे बघ, आपण बाहेर जाऊ तेव्हा तुला अगदीच वाटले तर एखाद्या वेळेस ड्रेस घालता येईल. पण, घरात चालणार नाही. कारण आपले एकतर एकत्र कुटुंब. त्यात ना धड शहर ना धड गाव. बाबा गावचे सरपंच. त्या मुळे येणारा जाणारा राबता खूप. गावात लोक नावं ठेवतात. त्या मुळे तुला आधीच कल्पना देतो आहे.’ लग्न ठरल्या वर साक्षगंधानंतर हे नवऱ्या ने सांगि तले होते. आधी बोलता तर? तर काय नुसत ड्रेस घालायला मिळणार नाही म्हणून तिच्या म्हणण्या वर कुणी हे लग्न मोडणार होते का? अजि बातच नाही. आणि ड्रेस घालणे हा काय फार मोठा इश्‍यू नव्हता. पण, त्याला त्या लोकानी प्रेस्टीज पॉइंट केले होते. आता उपयोग नाही या विचारांचा असं वाटून ति ने एक सुस्कारा सोडला. हळूच नजरेच्या कोपऱ्या तून पाहि ले नवरा मोबाईलमध्ये गेम खेळत होता. तिचा फोन पर्समध्ये असणार. काल दुपारपासून पाहीलाच नव्हता. रेल्वे स्टेशनमध्ये बेंचवर ते दोघे बसले होते. नवऱ्याच्या खांद्यावर दिलेले उपरणे आणि तिच्या पदराची गाठ बांधलेली होती. आता दोन्ही खांद्यावर पदर होता तिच्या आणि नवऱ्याचे उपरणे तिच्या मांडीवर. तिला बाजूला ठेवलेल्या पर्स मधला फोन घेऊन पाहावासा वाटला. म्हणून तिने उपरणे बाजूला ठेवायला खांद्यावरचा पदर बाजूला केला. उपरणे दोघांच्या मध्ये ठेवले. पर्स घ्यायला खाली वाकली.‘अग बाई, हे काय करतेस? आज उपरणे खाली नाही ठेवायचे. उचल ते आणि नीट दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन उपरणे ओटीत घेऊन बैस.’
‘आत्या , मी माझा फोन घेणार होते पर्स मधून’
‘थांब जरा. इतकं कुणाशी बोलयचंय? जेमतेम माहेर सुटलेय न? उद्या
घरी पोचल्या वर बोल. आधी पदर घे आणि उपरणे नीट मांडीत घे’
तेच तर. जेमतेम माहेर सुटलेय माझे. समजतय न?मग बोलू द्या न मला एक शब्द बाबांशी, आईशी. काहीतरी तुटून गेलंय आतले. माझाच माझा एक भाग मी कायमचा ति थे सोडून आलीय. उपरणे सांभाळणे नवऱ्याची जबाबदारी. माझी नाही. तो खुशाल ते बाजूला ठेवून फोनमध्ये गेम खेळतोय. मी बाजूला असून त्याला मन दुसरीकडे रमवावे वाटते आहे. या सगळ्या वाक्‍यांची मनातल्या मनात उजळणी केली. ओठातून बाहेर एकही आले नाही. बाबांनी फोन केला नसेल पण ह्या अर्ध्या तासात पन्नासदा पाहिले असेल की माझा फोन आलायं का? मन मागे मागे गेले. आई, बाबा, ताई, दादा सगळ्यामधे जाऊन बसले. काय करत असतील ते? नक्कीच घरभर असलेल्या सामानाच्या पसाऱ्या कडे सुन्न नजरेने पाहत असतील.
साधा वाढदिवस झाला कुणाचा की आलेल प्रेझेंट मीच उघडणार असा जणू मापदंड होता. आता कोण पाहील ते? की माझ्या मांडवपरतणीपर्यंत ठेवेल आई तसेच? नक्कीच. कारण सगळे दमलेले आहेत आणि माझ काम माझी नक्की वाट पाहील. आजूबाजूला स्टॉ ल लागलेले होते. भेळपुरीचा खमंग वास येत होता. दि वसभर अति शय श्रम झाले होते. ति ने पाय वर घेतले. मांडी घालून बसली. पायातले जोडवे आणि तोरड्या पावलाला कच्चकन रुतले. पायात नुसत्या कळा येत होत्या . ति ने पाय परत खाली सोडले. ति ला वाटले एक चक्कर चालून यावे का. तिने नवऱ्या कडे पाहि ले. त्याला डुलकी लागली होती. तिला पण वाटले आपणही एक झपकी घ्यावी. निदान उठून त्या बाजूच्या स्टॉलवरून एक प्लेट पाणीपुरी तरी खाऊन यावी. पण, एकंदरीत अनुभवानंतर ते शक्य नाही हे ति ला लक्षात आले. नवऱ्याचा फोन वाजत होता. आता त्याला आवाज तरी कसा द्यावा हे तिला समजेना. त्या ची मान बेंचवर टेकली होती. डोळ्या वर चष्मा तसाच होता. तिच्या बाजूला डोके कलले होते. त्याचे तोंड उघडे पडले होते. ति ला नकोसे झाले सगळे. फोनच्या आवाजाने तो खडबडून जागा झाला. त्याला संदर्भ लागत नव्हता. डोळ्या त अनोळखी भाव होते. मग त्याला लक्षात आले की आपली नवीन लग्न झालेली बायको आपल्या बाजूला अवघडून बसलीय आणि आपला फोन वाजतोय.
‘सॉरी हं! मलाच कळाले नाही झोप लागलेली. तुला कंटाळा आला
असेल न?’
‘फोन बघा आधी कुणाचा आहे ते’
‘अं . हो. हॅलो .
हं.
हो.
नको नको.
अर्धातास अजून
बरं
आहे न इथेच.
हं हे घे तुझ्या दादाचा फोन आहे’
फोन कानाला लावून तिने बोल इतके म्हणले. दादा काही सेकंद शांत. मग खाकरला. दहा मिनिटात येतो. तुझे आवडते आइस्क्री म घेऊन एव्हढे बोलून त्याने फोन कट केला.
दहा मिनि टे दहा युगा सारखे गेले. दादा मोठी पेटीभर आइस्क्री म घेऊन आला. सगळ्यांना डब्या दिल्या . माझ्या पुढे बेल्जीयम चॉकलेटचा कोन
धरला. ‘छी कित्ती कडू लागतं हे ही काय आवड तुझी?’ इतक्‍यात सासरचा कुणी लहान मुलगा आला. त्याला तो कोन हवा होता.
तिने उघडायच्या आधी तिच्या हातून कोन घेऊन तो पसार झाला. दादाने तिच्या समोर व्हॅनिलाची डबी केली. मग गाडी येईपर्यंत दादाच्या नुसत्याबाजूला उभे असण्याने तिला अजिबात एकटे वाटले नाही.धावत धावत एक सॅक पाठीला लटकवून कितीदाच तिने गाडी पकडली होती. आज सगळच ओझं शरीरावर होते. आणि मनावरसुद्धा. सगळ जड
झालं होतं. शरीर मन आणि मेंदूसुद्धा. दादाने तिला आत चढताना पाहि ले. आजपर्यंत प्रवासात खि डकी ति चीच असायची. आज अगदी कॉर्नरला बसून तिने दादाला टाटा केला. उपरणे तिच्याच मांडीत होते. नवरा प्लॅटफॉर्म वर दादाशी बोलत होता गाडी हलली. नवरा आत आला. दादा मागे मागे जात होता गाडी पुढे सरकत होती. दादा गाडीसोबत धावत होता. ‘मनू,पोचली की फोन कर.’त्याचा गळा भरून आला होता. तो थांबला. गाडीने वेग घेतला. तिने खिडकीजवळ जायचा प्रयत्न केला. पण, मधल्या सगळ्या ना ओलांडून ति ला जाताआले नाही. पुसट होत जाणारा दादा डोळे कोरडे करताना ति ला दि सला. नवरा जवळ येऊन बसला. तिने डोळे कोरडे केले. तिला फ्रेश व्हायचे होते.
‘मी फ्रेश होऊन येते’
‘थांब एकटीने जाऊ नकोस. नव्या नवरीने एकटे नाही राहावे’
आणि मनाला आलेल्या एकटेपणाचे, असुरक्षितपणाचे काय? हा प्रश्न ति ला ओरडून वि चारावासा वाटला.
कुणीतरी बोलले, कुणाला तरी सोबत पाठवले. गळ्या तला हार आणि
हातात उपरणे सांभाळत ती वॉशरूम जवळ गेली.
सि ंक जवळ उभे राहून ति ने तोंडावर सपसप पाणी मारले. तिला फ्रेश वाटायला लागले. तरतरी वाटायला लागली. ति ने समोर आरशात पाहि ले. भांगातला शेंदूर कपाळावर ओघळला होता.
तिला एकदम ‘ॐ शांती ॐ’ सि नेमातला डायलॉग आठवला.
.......... ‘एक चुटकी सिंदूर की कि मत तुम क्‍या जानो......’ खरंच. काय असते त्या ची कि म्मत?
कपाटात पडलेला ड्रेसचा ढीग प्रवासात न्यायची सॅक
जीन्स पर्स मध्ये कितीतरी मिस कॉल झालेला फोन पाणीपुरीचा घमघमाट तोंडाला न लागलेलं आइस्क्रीम मांडीत ओझ झालेलं उपरणं घामानी चिंब झालेली पाठ हारानी चि डचि डा झालेला जीव मांडवात पडलेल्या रिकाम्या खुर्च्या न जेवता झोपलेले आई बाबा सिंक समोर उभी राहून वि चार करणारी मी.
तिने रुमालाने तो ओघळ पुसला. परत सि ंदूर नीटनेटका केला आणि बर्थच्या शेवटच्या टोकाशी जाऊन बसली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com