ऑस्कर शिंडलर या देवमाणसाची कथा

अंजली दुरुगकर
Friday, 11 September 2020

.‘शिंडलर्स लिस्ट’ ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे. ज्यानं स्वतः जर्मनअसून, स्वतःचं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. ऑस्कर शिंडलर या धनाढ्य कनवाळू माणसानं ज्यूं च्या मदतीसाठी जे केलं, त्याची नोंद इतिहासातगौरवानं नोंदवली गेली.

१९३९ ते १९४५ हा कालखंड म्हणजे जगाच्या इतिहासातलं काळंकुट्ट पान.
एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीच्या , तेवढ्याच विकृत महत्त्वाकांक्षेनं
अख्ख्या विश्वाला वेठीला धरलं. हाच तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा.
युरोपची भूमी बेचिराख करणारा, माणुसकीला काळिमा फासणारा. ज्यूं
चा वंश नष्ट करण्याची प्रतिज्ञा नाझी भस्मासुरानं केली होती. जर्मनीने
युद्धाची सुरुवात केली आणि बघता बघताऑस्ट्रिया, हॉलंड, फ्रान्स, इटली, रोमानिया,हंगेरी, पोलंड हे सगळे देश त्यात होरपळूननिघाले. त्यातल्या त्यात दुर्दैवी ठरला पोलंडहा देश. नाझींनी ज्यूंसाठी उघडलेल्या ३२०
छळछावण्यांपैकी ३०० छावण्या पोलंडमध्येहोत्या. या कालखंडात लाखो ज्यू नागरिकांनाहकनाक बळी पडावं लागलं. नाझींमधल्यासैतानी वृत्तीनं कळस गाठला होता. पण,त्याचबरोबर अनेक ठिकाणी जणू काही देवच
माणसाच्या रूपात या संकटात सापडलेल्यामाणसांच्या मदतीला धावून जात होता

.‘शिंडलर्स लिस्ट’ ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे. ज्यानं स्वतः जर्मनअसून, स्वतःचं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. ऑस्कर शिंडलर या धनाढ्य कनवाळू माणसानं ज्यूं च्या मदतीसाठी जे केलं, त्याची नोंद इतिहासातगौरवानं नोंदवली गेली.

लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरनं वाचवलेल्याज्यूं पैकी एक. ऑस्करची ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात प्रयत्न केले. थॉमस केनेली या थोर प्रतिभावंत लेखकानं ‘शिंडलर्स लिस्ट’ ही संपूर्ण सत्यकथेवर आधारित गाथा पुस्तकरूपानं सर्वांसमोर आणली.

जगभरात या पुस्तकाला बुकर पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले. पुढे स्टिव्हन स्पिलबर्ग या हॉलीवूडच्या महान दिग्दर्शकानं त्यावर चित्रपटही बनवला आणि तो सात ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ठरला. थॉमस केनेली लिखित ‘शिंडलर्स लिस्ट’
या पुस्तकाचा तेवढाच प्रभावी अनुवाद केला आहे, संजय दाबके यांनी. दुसऱ्या
महायुद्धातल्या सुन्न करणाऱ्या भीषण घटनांवर आधारित हे ऐतिहासिक सत्य आहे.
हे पुस्तक वाचताना आपण अंतर्बाह्य हलून जातो. पराकोटीच्या क्रौर्यानं आणि
संपूर्ण नाझी ज्यूंच्या विनाशासाठी सज्ज असताना, त्याच ज्यूंचे प्राण वाचवण्यासाठीशर्थीचे प्रयत्न करणाऱ्या ऑस्कर शिंडलरच्या मनात आणि कृतीत दिसणाऱ्या निखळ माणुसकीच्या दर्शनानं.
पोलंडमधल्या क्रॅकॉव शहरात ऑस्कर शिंडलर या उद्योगपतीनं स्वतःचा
नवा उद्योग सुरू केला होता. आपल्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी तो या
पदावरच्या नाझी जर्मन अधिकाऱ्यांशी मैत्री राखून होता. कामं करवून घेण्यासाठीत्यांना मोठमोठ्या भेटवस्तू देत होता. जर्मन इनॅमलवेअर फॅक्टरी हे शिंडलरच्याव्यवसायाचं नाव होत. स्वतः जर्मन असला तरी हिटलरच्या ज्यू विरोधी दुष्टकारवाया त्याला कधीच पसंत नव्हत्या .
पोलंडमध्येही ज्यू विरोधाचं लोण पसरलं होतं. ज्यूंसाठी नाझींनी छळछावण्या
म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कॅंप उभारायला सुरुवात केली होती. ज्यू वंशाचे लोक खरंतर बुद्धिमान, यशस्वी व्यापारी, समाजात प्रतिष्ठित डॉक्टर्स , वकील, इंजिनिअर्स ,शास्त्रज्ञ असे होते. पण, नाझींच्या वक्रदृष्टीमुळे त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. ज्यूं चे व्यवसाय बंद पाडले गेले. त्यांची राहती मोठंमोठी घरं, संपत्ती जप्त करण्यात आली. संपन्न आयुष्य जगणारे लोक बघता बघता रस्त्यावर आले. ज्यूंसाठी वेगळ्या वसाहती उभारल्या गेल्या . अतिशय अडचणीच्या , बकाल, कुठल्याच सोयी नसलेल्या वसाहती. सगळ्या ज्यूंना नेसत्या वस्त्रानिशी तिथे कोंबण्यात आलं.
ज्यांनी विरोध केला त्यांना जीवच गमवावा लागला. स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध
व्यक्‍ती कुणाच्याच जीवाची शाश्‍वती नव्हती. नाझी अधिकाऱ्यांना लहर आली की,या नि ष्पाप जीवांची खैर नसे. अमानुष छळ, मारहाण, मनात येईल त्याला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार करणं हे नित्याचं होतं. नाझींना त्यांच्या कामासाठी, मजुरी करण्यासाठी फक्त धडधाकट ज्यू हवे होते. फक्त राबण्यासाठी.
वृद्ध मंडळी, लहानगी मुलं यांना मरणाला सामोर जाणं अटळ होतं. ऑस्कर शिंडलरच्या डोळ्यादेखत हे अनन्वित अत्याचार घडत होते. त्यांच्या फॅक्टरीत जे ज्यू कामावर होते, त्यातल्या त्यात ते सुस्थितीत होते. अमॉन गॉथ हा पोलंडमधल्या प्लास झो कॅंपचा नाझी प्रमुख.

रोज तिथला प्रत्येक ज्यू , आपण संध्याकाळी जिवंत असू की नाही याबाबत साशंकअसायचा. अमॉनची लहर फिरली की त्याची बंदूक किती ज्यूं चा जीव घेईल याची गणतीच नसे. अशा वातावरणात या ज्यूं चा जीव वाचवण्यासाठी ऑस्करचा जीव तळमळत होता. पुस्तक वाचताना अशा अनेक घटना आपल्यासमोर येतात,
ज्यातल्या क्रौर्यानं आणि ऑस्कर शिंडलरच्या सहृदयतेनं आपण सुन्न होतो.
प्लास झो कॅंपमधल्या ऑस्करच्या ज्यू कामगारांना ऑशूविझ इथल्या छळछावणीत, साक्षात मृत्यूच्या जबड्यात नेलं जातंय हे कळल्याबरोबर ऑस्करनं त्या दुष्ट नाझी अधिकाऱ्यां ना लाच देऊन, गोड बोलून, गुरांसारखी ज्यू माणसं कोंबलेल्या त्या आगगाडीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत धावत, आपल्या कामगारांच्या नावानं त्यांना हाका घालून शोधून काढलं. हा प्रसंग तर अंगावर काटा आणतो. प्रत्यक्ष मरणाच्या दाढेतून त्या व्यक्‍ती ऑस्करमुळे वाचल्या . असे अनेक अंगावर शहारा
आणणारे प्रसंग आपल्यासमोर येतात. ‘तुझ्या कारखान्यासाठी आवश्‍यक ज्यूं ची यादी तू बनव. तेवढ्यांची जबाबदारी तुझी’ हे आश्‍वासन नाझीकडून ऑस्करलामिळतं आणि मग तयार झाली ती ‘शिंडलर्स लिस्ट’. या यादीत आपलं नाव यावं म्हणून कित्येक ज्यूं नी प्रयत्न केले असतील. ब्रिनालिट्झ येथील ऑस्करच्याफॅक्टरीत अखेर १२०० भाग्यवंत ज्यू पुरुष, स्त्रिया, मुलं, वृद्ध आलेत. ऑस्करच्या छत्रछायेत राहिले. अखेरीस तो जीवघेणा कालखंड संपला. युद्ध संपल्याची घोषणाझाली. ज्यूं च्या गळ्यातला ताईत, त्यांचा तारणहार ऑस्कर शिंडलररशि याच्या हाती न सापडता सुखरूप स्विर्झलॅंडला पोचला. ज्यूं ची त्या भीषण कालखंडानंतर सुटका झाली. १२०० लोकांनी या देवदूताच्या वरदहस्तामुळे आपल्या मातृभूमीत परतण्याचं भाग्य अनुभवलं. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या पुस्तकामुळे इतिहासात अजरामर झालं. प्रत्येकानं हे पुस्तक जरूर वाचावं.
कारण एका माणसाच्या हृदयातला चांगुलपणा किती विलक्षण बदल घडवू शकतो याची ही कथा आहे. आणि सध्याच्या काळात आपल्याला याची गरज आहे

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of oscar schindler