टपाल तिकिटावर चक्क अंडरवर्ल्ड डॉनचा फोटो, टपाल विभागाचा भोंगळ कारभार

पूजा विचारे
Monday, 28 December 2020

मुख्य टपाल कार्यालयाकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेलं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं आहे.

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा फोटो पोस्टाच्या तिकीटावर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. कानपूरच्या टपाल विभागानं हा विचित्र पराक्रम केला आहे. मुख्य टपाल कार्यालयाकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेलं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, माय स्टॅम्प ही योजना टपाल विभागाकडून राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत हे टपाल काढलं गेलं आहे. 

१२ तिकिटं छापण्यात आली आहेत. त्याची किंमत पाच रुपये आहे. यातल्या १२ फोटोंवर छोटा राजन आणि इतर १२ फोटोंवर मुन्ना बजरंगीचा फोटो दिसतोय. दरम्यान या अनागोंद कारभाराप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. 

नेमकी माय स्टॅम्प योजना

केंद्र सरकारनं २०१७ मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपला किंवा ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापून घेऊ शकतो. या तिकीटासाठी ३०० रुपये भरावे लागतात. हे तिकीट छापून घेण्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट साइज फोटोसहित संपूर्ण माहिती द्यावी लागते. त्यासाठी एक फॉर्म भरुन द्यावा लागतो. ज्यात संपूर्ण माहिती घेतली जाते. तसंच मृत व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापता येत नाही. अर्जदाराला कार्यालयात हजर राहावं लागतं. या प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतंय.

हेही वाचा-  मुंबईत तिसऱ्यांदा होणार सिरो सर्व्हे,  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे होणार ऑडिट
 

चौकशी होणार 

टपाल विभागाचे पोस्ट मास्टर जनरल वीके शर्मा यांनी म्हटलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल. पुढे ते सांगतात की, नियमाअंतर्गत तिकीट काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कार्यालयात हजर राहावं लागतं. तिथे वेबकॅमच्या आधारे फोटो घेतला जातो. जर कोणत्या गुंड किंवा माफियाच्या नावे तिकीट प्रसिद्ध झालं आहे. त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Viral news underworld don chhota rajan photo postal stamps kanpur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral news underworld don chhota rajan photo postal stamps kanpur