कॅपिटॉल हिल आणि लाल किल्याचा संबध जोडणे चुकीचे, परराष्ट्र खात्याच्या कृतीमुळे शेतकरी आंदोलन जगभरात पोहोचले 

कॅपिटॉल हिल आणि लाल किल्याचा संबध जोडणे चुकीचे, परराष्ट्र खात्याच्या कृतीमुळे शेतकरी आंदोलन जगभरात पोहोचले 

मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन सेलिब्रिटींच्या ट्‌विटर युध्दामुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. अमेरिकेने हा प्रश्‍न चर्चेने सोडवला जावा या आशयाचे विधान केले. या नंतर भारतीय परराष्ट्र खात्याने लाल किल्यावरच्या हिंसाचाराची तुलना अमेरिकन कॅपिटॉल हिलच्या हिसांचारासोबत केली. लाल किल्याच्या घटनेनंतर भारतात अमेरिकन कॅपिटॉल हिलच्या हल्याप्रमाणेच प्रतिक्रीया उमटल्या असे विधान परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार यांनी केले. आंतराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांच्या मते या दोन्ही घटना वेगवेगळ्या स्वरुपाच्या असून त्यांची एकत्र तुलना करणे हे चुकीचे आहे. 

आंतराष्ट्रीय विषयाचे जाणकार, अभ्यासक  सुधींद्र कुलकर्णी यांच्या मते कॅपिटॉल हिल आणि लाल किल्यावरच्या घटनेची तुलना करणेच मुळाच आश्चर्यजनक आहे.तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथावणीनंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिलमध्ये घूसून हिंसाचार केला. त्या दिवशी नियोजीत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निवडीची अंतिम प्रक्रीया सुरु होती. ती घटनात्मक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी हा हिंसाचार घडवला गेला. मात्र आपल्या देशात  गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग पत्करला नाही. त्यातले काही लोक लाल किल्यापर्यंत पोहोचले, त्यांनी हिंसाचार केला, हे चुकीचे आहे. ते कोण होते, हा पोलिस तपासाचा विषय आहे. कृषी कायदे चुक की बरोबर हा वेगळा मुद्दा आहे. मात्र कुठल्याही कायद्याला विरोध करणे,आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार आहे, असे सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

अमेरिकन गायिका रिहाना, स्वीडनच्या बाल पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि मिरा हॅरीस यांनी देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला.या नंतर देशातील बॉलीवूड स्टार्स, खेळाडू यांनी हा देशाचा अंतर्गत मुद्दा असून, बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये असे प्रत्युत्तर दिले. या गदारोळानंतर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तडकाफडकी प्रसिध्दी पत्रक जारी केले. सुधींद्र कुलकर्णी यांच्या मते मुळात परराष्ट्र मंत्रालयाने देशाच्या अंतर्गत विषयावर बोलू नये, असा संकेत आहे. अमेरिकेच्या एका गायिकेच्या ट्विटरवर एवढा गदारोळ करण्याची गरज नव्हती. आणि त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने लांबलचक प्रतिक्रिया द्यावी ही चांगली बाब नाही. उलट या प्रतिक्रीयमुळे संपुर्ण जगाचे लक्ष आता शेतकरी आंदोलनाकडे वळले आहे. याकडेही कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. 

अमेरिकन संसदेतील हिंसाचार आणि लाल किल्यावरच्या हिंसाचाराची तुलना का करण्याचे कारण काय, यावर वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी तसा संबध नाही. मात्र हा संबध जर जोडला जात असेल तर त्यामागे परराष्ट्र मंत्रालयाचे काही धोरणात्मक बाब असेल. नेमके काय धोरण आहे हे आता सांगता येणार नाही. असे आंतराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलैंद्र देवळाणकर यांनी म्हटले आहे. तर शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार अगतीक झाले आहे. काय करावे सुचत नाही, त्याकतून या चुकीच्या प्रतिक्रीया उमटत असल्याचे मत सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

special story connecting capitol hill with red fort is not right reasons how farmers protest reached world wide

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com