निसर्गग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून आणखी मिळाली मदत; इतका निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा

महेंद्र दुसार
Sunday, 16 August 2020

रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव नुकसानभरपाईसाठी मागणी करण्यात आलेले 50 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाले आहेत. ऐन गौरी-गणपतीच्या सणातच ही मदत खात्यात जमा होणार असल्याने नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव नुकसानभरपाईसाठी मागणी करण्यात आलेले 50 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाले आहेत. ऐन गौरी-गणपतीच्या सणातच ही मदत खात्यात जमा होणार असल्याने नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा : निसर्गनंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहूर्त लांबला

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांच्या पडझडीसाठी, भांडी, कपडे, मच्छीमार यांना पूर्वीच्या निकषात बदल करून वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासाठी 50 कोटींचा वाढीव निधी सरकारकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त न झाल्याने निसर्गग्रस्त भरपाईपासून वंचित राहिले होते. राज्य सरकारने 50 कोटींचा वाढीव निधी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्याने नुकसानग्रस्तांच्या खात्यात आठवड्याभरात ही मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. 

गुन्हे वार्ता : मुंबईत घरात घुसून महिलेवर अत्याचार; तीन नराधमांना अटक

निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील दोन लाख घरांचे नुकसान झाले होते. चक्रीवादळानंतर राज्य सरकारने त्वरित पावले उचलून पावणे चारशे कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले. यातील पावणे तीनशे कोटी रुपये हे घरांच्या नुकसानीसाठी दिले होते. या मदतनिधीचे वाटप पूर्ण झालेले आहे; परंतु नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळालेली रक्कम तुटपुंजी असल्याने 50 कोटी वाढीव मदतनिधीची मागणी करण्यात आली होती. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More 50 crores funds for Raigad people who was suffered from Nisarg cyclone