गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, मग 'या' मार्गे जा...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, मग 'या'  मार्गे जा...

मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे. 

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील मार्गानी प्रवास करावा 

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एन.एच.48) येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली - वाकण (67.5 कि.मी.) मार्गावरून जाणाऱ्यांनी  मुंबई - पुणे एक्सप्रेस वे-खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस, वाहने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे-(एनएच-4) सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा. कळंबोली - हातखंबा मार्गाऐवजी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे -(एनएच 4), सातारा - कराड - वाठार - टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर - शाहुवाडी - आंबा घाट - साखरपा - हातखंबा या रस्त्याने जावे. तसेच कळंबोली-राजापूर मार्गाऐवजी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरून सातारा - कराड - वाठार - टोप येथून उजवीकडे वळण घेऊन मलकापूर - शाहुवाडी - आंबा घाट - लांजा - राजापूर या मार्गाने जावे.

कळंबोली - कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा - कराड - कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरुन - कळे - गगनबावडा घाट - वैभववाडी - कणकवली या रस्त्याचा वापर करावा.

सावंतवाडीला जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली - सावंतवाडी ऐवजी मुंबई - पुणे एक्सप्रेस वेमार्गे सातारा - कराड - कोल्हापूर - निपाणी - आजरा - आंबोली घाट - सावंतवाडी या रस्त्याचा वापर करावा.

महामार्गावर येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाईट www.highwaypolice.maharashtra.gov.in तसेच हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 तसेच संक्षिप्त संदेश सेवासाठी (SMS) 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com