वारांगणांच्या वस्तीतील नवरात्रौत्सव...

दिनेश चिलप मराठे
Wednesday, 27 September 2017

येथील काही वारांगणांच्या मुला मुलींनी उच्च शिक्षण घेत चांगल्या नोकऱ्या मिळविलेल्या आहेत. त्यांनी आपल्या आईला येथून आपल्या सोबत घेऊन चांगल्या सोसाइटीत नेले. आज त्यांचे जीवन सुखी झालेले आहे तर आम्ही खिचपत पडलोय. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त मंडळ जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेत असते.

मुंबईः
यहाँ सिर्फ जिस्मोंका सौदा नही होता !
माँ भगवती का सिमरन भी होता है !

दक्षिण मुंबईतील कामाठी पुरा येथील 11,12,13 आणि 14वी गल्ली हा विभाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. वारांगणांच्या वास्तव्यामुळे बदनाम झालेली वस्ती म्हणूनही हा विभाग ओळखला जात आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्याचे एकमेव साधन म्हणजे शरीर विक्रय हेच दैनंदिन जीवन येथील वारांगणांनी स्विकारलेले आहे. येथे नवरात्रौत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो, अशी माहिती मिळाल्याने 'सकाळ'च्या वाचकांना येथील काळ्या पदराची सुंदर अशी सोनेरी किनार लोकांसमोर यावी म्हणून येथे भेट दिली असता. तेथेच उभ्या असलेल्या मुमताज (नाव बदलले आहे) हिला आप यहाँ अपने कमाईका ज़रिया सही ना होनेके बावजूद भी नवरात्रीमें देवी की आराधना करते हो क्या? या प्रश्नावर तिने अनपेक्षित उत्तर दिले की,
यहाँ सिर्फ जिस्मोंका सौदा ही नही होता !
नवरात्री में हमसे माँ भगवती का सिमरन भी होता है l
पापी पेटका सवाल है l इसीलिये यह गंदा काम करते है l
कोई भी लड़की इस दलदलमे शौक से नही आती l
असे म्हणत तिने येथे देवीची स्थापना झालेल्या मंडळांकड़े जाण्याचा मार्ग दाखवित निघून गेली.

येथील विविध गल्ल्यांमध्ये तेथील मंडळानी स्थापिलेल्या देवींचे दर्शन घेताना भाविकांची गर्दी दिसून येत होती. तेथीलच 11 वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ यांनी स्थापिलेली अष्टादश भुजा  (18 हातांची) महिषासुरमर्दिनीचे दर्शन घेताच आपल्या समोर साक्षात आई भवानी उभी असल्याचे जाणवते. चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात.मन प्रसन्न होते. आपण नकळत हात जोडीत अंबामाता चरणी लीन होतो.

या मंडळाची खासियत म्हणजे ही देवीची मूर्ति वारांगणांनी स्वखुशीने दिलेल्या वर्गणीतून तसेच आजुबाजूच्या रहिवाशांकडून प्राप्त देणगीतुन साकारण्यात आलेली आहे. सर्वांच्या सहभागाने येथे नवरात्री उत्सव साजरा करण्यात येतो. आईच्या अंगावरील सर्व दागिने हे अस्सल सोन्याचे असून, दिवसातून 2 ते 3 वेळा नवीन साडया देवीला नेसविण्यात येतात.

देवीच्या साजश्रृंगारासाठी अंगावर असलेली कर्णफुले, कमरपटटा, नथ, बाजू बंद, बांगड्या आदी विशेष अलंकारही खऱ्या सोन्याचे दागिण्यानी घडविण्यात आलेले आहेत. देवीची आराधना-उपवास आणि सिमरन, आरतीसाठी या महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्याच कमाईतून उत्सवासाठी लागणारा खर्च करण्यात येतो, यात स्थानिक रहिवाशांचाही तेवढाच वर्गणी आणि देणगी स्वरुपात आर्थिक हातभार लागतो, म्हणूनच येथील नवरात्रौत्सव सर्वात जास्त पवित्र असल्याचे सिद्ध होते.

मंडळाचे कार्यकर्ते येथील देहविक्रय करणाऱ्या वारांगणांच्या आजारपणात मानवी कर्तव्य म्हणून त्यांच्या औषधोपचारावर खर्च करते, असे दहावी शिकलेले मंडळाचे देवीचे सेवेकरी गणेश कोसुरी यांनी आणि सोशल वर्कर परशुराम पाटील यांनी सांगितले. येथील एड्स झालेल्या वारांगणाना आणि त्यांच्या मुलांना विविध सामाजिक संस्थामार्फत वैद्यकीय आणि शैक्षणिक सहकार्य करण्यात येते. मुलांना शाळेच्या एडमिशन सहित बोर्डिंग आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. यात साई संस्थेचे शैलेश सर, बॉम्बेटिन चॅलेंज, प्रेरणा संस्था, अपने आप, खारघर येथील नवनिहार आदी संस्था मार्फत एडस ग्रस्त महिलांना मदत करीत आहेत. राजकीय पक्ष, नेते फक्त निवडणुकीतील मतांसाठी आमचा वापर करतात. काम झाले की विसरतात. पूर्वी येथे रक्षा बंधन करण्यासाठी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यायचे. आता तर कोणीही येत नाही. आमच्या साठी सरकारी पुनर्वसन योजना नाही. आम्हाला उतार वयात पोटा पाण्यासाठी निवृत्ती वेतन मिळावे, अशी सरकारकडे मागणी केली आहे. आम्हालाही सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे म्हणून सरकारने काहीतरी करायला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumabi news navrati in kamathi pura area