अमृतांजन पूल पाडण्यास अखेर सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

नियंत्रित स्फोटकांच्या आधारे सदर पूल पाडण्यात येत असून महामंडळाच्या वतीने योग्य खबरदारी घेत मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक तुरळक स्वरूपात आहे.  

बोरघाट (खंडाळा): पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील १९० वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास रस्ते विकास महामंडळाच्यावतीने अखेर सुरुवात झाली आहे.

नियंत्रित स्फोटकांच्या आधारे सदर पूल पाडण्यात येत असून महामंडळाच्या वतीने योग्य खबरदारी घेत मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक तुरळक स्वरूपात आहे.  

रविवारी सकाळपासुन काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे द्रुतगतीवरील वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गांने वळविण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally Amrutanjan bridge demolished work started