गारगाई प्रकल्पग्रस्तांची चिंता मिटणार 10 लाखांची भरपाई! 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • स्थायी समितीला प्रस्ताव;
  • पुवर्सनासाठी 365 एकर जागा निश्‍चित 

मुंबई : महापालिका गारगाई प्रकल्पातील विस्थापितांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करणार आहे. तसा प्रस्ताव या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समिती बैठकीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

महत्वाचं - बांधकाम व्यवसायायला जीएसटीचा फटका 

मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिका पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधणार आहे. महापालिका या प्रकल्पासाठी 3100 कोटी रुपये खर्च करणार असून, मुंबईला रोज 44 कोटी लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. या प्रकल्पामुळे 619 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी जागा देण्याचा प्रस्ताव बाधित होणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतींनी मंजूर करून महापालिकेला पाठवला. त्यानुसार महापालिकेने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

हेही वाचा - पोलिस खुन्याच्या त्या ठिकाणी गेले पण...

गारगाई प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वाडा-मनोर मार्गावरील देवळी गावाजवळ 365 हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. ती जमीन ताब्यात घेऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने वेगाने हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समिती बैठकीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. 

असा आहे प्रकल्प 

  • - धरणामुळे 840 हेक्‍टर जमिन बाधित. 
  • - धरणाची उंची 69 मीटर, लांबी 972 मीटर. 
  • - धरणातून दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी मोडकसागर तलावात. 
  • खर्चाचा तपशील 

- प्रकल्पाचा एकूण खर्च : 3105 कोटी रुपये 
- वन विभागाच्या 670 हेक्‍टर जमिनीसाठी भरपाई : 1025.28 कोटी 
- धरणग्रस्तांचे पुनर्वसन : 435.16 कोटी 
- खासगी जमिनीचे संपादन : 152.22 कोटी 
- धरणाचे बांधकाम : 1283 कोटी 
- दोन जलबोगद्यांचे बांधकाम : 167 कोटी 
- प्राथमिक अभियांत्रिकी सल्ला : 15.16 कोटी 
- अभियांत्रिकी कामे : 24.35 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 lakh compensation to Garagai project victims