माटुंगा कार्यशाळेतील 100 वा एलएचबी कोच प्रवाशांच्या सेवेत

कुलदीप घायवट
Thursday, 14 January 2021

मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने माटुंगा कार्यशाळेतून नुकतेच 100 वे एलएचबी कोचच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले. कोच नुकताच प्रवाशांच्या सेवेत आणला गेला. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने माटुंगा कार्यशाळेतून नुकतेच 100 वे एलएचबी कोचच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले. कोच नुकताच प्रवाशांच्या सेवेत आणला गेला. 

माटुंगा कार्यशाळेत एलएचबी कोचची देखभाल-दुरुस्ती केली जाते. लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्‍यक सेवेत देखभाल-दुरुस्तीचे काम मध्य रेल्वेकडून सुरू ठेवण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करून माटुंगा कार्यशाळेच्या कार्यसंघाने नियमित कामकाज चालू ठेवले. त्यानुसार एक एक एलएचबी कोचच्या अंतर्गत बाबीची दुरुस्ती, चाके बदलणे, बाह्य आवरण बदलणे, खालील भाग दुरुस्त करणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा कार्यशाळेतून 100 वा एलएचबी कोच प्रवाशांच्या सेवेत रुजू झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वेचे मुख्य यांत्रिकी अभियंता ए. के. गुप्ता आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कामगिरी करण्यात आली. माटुंगा वर्कशॉप टीमने एलएचबी कोचच्या देखभालीसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे मध्य रेल्वेवरील ताफा वेगाने वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी माटुंगा टीमने केलेल्या दर्जेदार कामाचे कौतुक केले.

 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 100th LHB coach at the Matunga workshop serves passengers