मराठीत शिकलेत म्हणून नाकारली नोकरी..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

मुंबई - त्यांचा गुन्हा होता त्यांचं मराठीतलं शालेय शिक्षण आणि म्हणूनच त्यांच्यावर आली नोकरीवरून नाकारलं जाण्याची वेळ. होय, ही धक्कादायक बाब समोर आली आहे मुंबईत. त्याच मुंबईत जिथे मराठी भाषेवरून आणि मराठी माणसावरून मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं. दहावी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांची नेमणूक डावलली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्यात येतोय. 

मोठी बातमी -  'मुख्यमंत्री असो वा आमदार, चौकशीसाठी बोलवलं जाईल'; वायरलेस रेकॉर्ड्सही तपासण्याची परवानगी

मुंबई  महानगरपालिका शाळेत प्रशासनाच्या पवित्र पोर्टलवरून शिक्षक नियुक्ती केली जाते. यासाठी शिक्षकांच्या परीक्षा देखील घेतल्या जातात. डिसेंबर २०१७ मध्ये शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्यात आलेल्या.  मात्र धक्कादायक बाब म्हणजे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 102 उमेदवारांना त्यांचे दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण मराठीत असल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून झालेली नेमणूक करता येणार नाही, असं शिक्षण विभागाने सांगितलं आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे या १०२ उमेदवारांचं शालेय शिक्षण वगळता इतर शिक्षण इंग्रजीतून झालंय  

मोठी बातमी - चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार 

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांना मुलांना इंग्रजी शिकवता आलं पाहिजे, समजावता आलं पाहिजे.  केवळ शालेय शिक्षण मराठी माध्यमातून असल्याने पात्र उमेदवारांना डावलणे योग्य नाही. या प्रकरणात लक्ष घालून, पुढील कारवाई करू असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.

आता याप्रकरणी मराठीचा पुळका असणारे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

102 qualified teachers are on hold just because they did their schooling from vernacular medium

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 102 qualified teachers are on hold just because they did their schooling from vernacular medium