
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज १०६ आमदारांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. कालपासून (शनिवारी ) सुरु झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतली असल्याने आतापर्यंत २७९ आमदारांची शपथ झाली आहे, तर आज आठ आमदार विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी उद्या (सोमवारी) होणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी अधिवेशनाच्या आधीच राज्यपालांसमोर शपथ घेतली आहे.