खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

प्रधानमंत्री आवास योजनेचे  काम पाहणाऱ्या म्हाडा अधिकारीने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याला दिल्लीमध्ये  होणाऱ्या बैठकीत घरनिर्माण प्रगती यावी याचे आदेश मिळतात त्यानुसार कामात गती आणली जाते.  

मुंबई : राज्यात पंतप्रधान आवास योजनेत आतापर्यंत 11.5 लाख घर निर्मितीला मिळाली आहे. आतापर्यंत 3.84 लाख घरांचे काम वेगाने सुरू आहे. जुलै महिन्यात 20 राज्यातील विभागातील शहरात मंजुरी मिळाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे  काम पाहणाऱ्या म्हाडा अधिकारीने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याला दिल्लीमध्ये  होणाऱ्या बैठकीत घरनिर्माण प्रगती यावी याचे आदेश मिळतात त्यानुसार कामात गती आणली जाते.  

जुलै महिन्यात नागपूर 500, औरंगाबाद - गंगापुर 250, हिंगोली  100, सावनेर 100, कलमेश्वर  82, अर्दापुर  700, दापोली  160, यवतमाल 184, अकोला 340, शेगांव  90, मलकापुर  200, एरंडोल  88, इचलकरंजी  120, विवापुर 116, जुन्नर  53, रोहा 153, कराड  160  अशी एकूण 20 हजार घरे बांधण्यासाठी परवानगी मिळाली आहे याशिवाय मुंबई गोरेगांवमध्ये 
प्रधानमंत्री आवास योजनेत  घर  बनविण्यासाठीचा पस्तावाला मंजूर मिळावी यासाठी तो राज्य सरकार कडे पाठवला आहे. मंजूरी मिळताच मुंबईत पीएमवाई घरनिर्मिती सुरूवात होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 lakh 5 thousand homes permitted for Pradhanmantri avas scheme