Crime News : 11 वर्षीय मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार; आरोपी नराधम अटकेत

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
11-year-old girl abused stepfather Accused arrested mumbai police
11-year-old girl abused stepfather Accused arrested mumbai policeesakal

मुंबई : वाढदिवसानिमित्त देव दर्शन आणि नवीन कपड्यांचे आमीष दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईतील समता नगर पोलिसांनी सावत्र पित्याला अटक केली. आरोपीने घटनेबाबत कोणालाही माहिती न देण्यासाठी पीडित मुलीला धमकावले व मारहाण केल्याचा आरोप आहे.

11-year-old girl abused stepfather Accused arrested mumbai police
Crime News : प्लॉटिंगवरून वादात पोलिसांवर दगडफेक; उपनिरीक्षक, अंमलदार गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील एका हॉटेलमध्ये आरोपीने हा गैरप्रकार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

11-year-old girl abused stepfather Accused arrested mumbai police
Crime News : 'मी असताना तू त्याच्याशी..'; कासिमनं घरात घुसून हिंदू मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक

तक्रारीनुसार, 11 वर्षीय पीडित मुलीचा वाढदिवस असल्यामुळे आरोपीने तिला देवदर्शनासाठी नेतो तसेच नवीन कपडे देतो असे आमीष पत्नीला दाखवले. परंतू आरोपीने शिर्डीतील एका हॉटेलमध्ये पीडित मुलीवर अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्चता करू नये अशी धमकी आरोपीने दिली.

11-year-old girl abused stepfather Accused arrested mumbai police
Mumbai Crime : दारासमोर चप्पल ठेवल्याच्या रागातून वाद; जोडप्याने केली शेजारच्याच हत्या

तसेच मारहाणही केली. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर सोमवारी 6 मार्चला आरोपीला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com