Palghar News : मोखाडा तालुक्यातील डोल्हारा तलावात बुडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील पाझर तलावात जान्हवी देवीदास कडू, या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे.
11-year-old girl died after drowning in Dolhara lake in Mokhada taluka marathi News
11-year-old girl died after drowning in Dolhara lake in Mokhada taluka marathi News

मोखाडा. ता. (बातमीदार ) - मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील पाझर तलावात जान्हवी देवीदास कडू, या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवार 1 जुन रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मोखाडा पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशीरापर्यंत जान्हवीचा तपास लागला नाही. अखेर, दुसर्या दिवशी  तालुक्यातील घोसाळी येथील तरुणांच्या मदतीने जान्हवीचा मृतदेह हाती लागला आहे. या घटनेची मोखाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

याबाबत मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी देवीदास कडु  ( 11 ), व तिची  मैत्रीण मनु किसन बोढेरे ( 12 )  या दोघी डोल्हारा येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी जान्हवी हीस पाण्याचा अंदाज आला नाही तसेच जान्हवी हिस पोहता येत नसल्याने ती खोल पाण्यात जावुन बुडुन मृत्यू पावली आहे. या घटनेची खबर जान्हवी चे मामा किशोर खोडे यांनी मोखाडा पोलिसांना दिली आहे‌. जान्हवीच्या मृत्यू बाबत माझा कोणावर संशय नसुन काही एक तक्रार नसल्याची खबर खोडे यांनी दिली आहे‌.

11-year-old girl died after drowning in Dolhara lake in Mokhada taluka marathi News
Palghar News: निळमाती घाटात सापडले २ दिवसांचे नवजात बालक, परिसरात खळबळ

मोखाड्यातील साहसी तरुणांची मदत

मृत जान्हवीचा तपास उशीरा पर्यंत लागत नसल्याने पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  (एन्.डी.आर.एफ.)  यांना पाचारण केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी मोखाड्याजवळील घोसाळी येथील वामन जाणू माळी, जगन सक्रू माळी, नाना सक्रू धोंडगा, शिवराम वसंत दिघा, दिनकर झिपर मुरथडे आणि रावजी लक्ष्मण दिघा या सर्वानी धाडसी व अथक प्रयत्न करून जान्हवीचा मृतदेह शोधून काढला. त्यांच्या सत्कार्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांनी कौतुक केले असून मोखाडा पोलिसांना तपास कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

11-year-old girl died after drowning in Dolhara lake in Mokhada taluka marathi News
Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!

पालकांनी पाल्यांची काळजी घ्यावी

उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने आपली पाल्ये आजोळी जावून सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगत असतात. मात्र त्यातून अनेक दुर्घटना घडत असतात आणि त्यायोगे आपल्या जीवलगांची जीवीत हानी आपल्याला पाहवी लागते. ही कधीही भरून न निघणारी हानी असल्याने पालकांनी आप आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच खबरदारीच्या दृष्टीने त्यांचे योग्य ते समूपदेशन करण्याचे आवाहन मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com