पनवेलमध्ये राहते घर कोसळून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, बचाव कार्य सुरु

दीपक घरत
Tuesday, 8 September 2020

पनवेलमधील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या पेंधर गाव येथे जुने राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईः  पनवेलमधील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या पेंधर गाव येथे जुने राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर 3 जण जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पेंधर येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील भूखंड क्रमांक 27 च्या शेजारी असलेले जुने राहते घर सकाळी 7 च्या सुमारास कोसळले. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्या खाली व्यक्ती अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं आहे. या बचावकार्या दरम्यान  हंसिका,अनपण आणि संतोष या तिघांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. ११ वर्षीय हिना हरिजन या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

---------

(संपादनः पूजा विचारे)

11 year old girl dies after house collapses in Panvel


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 year old girl dies after house collapses in Panvel