उल्हासनगर - गेल्या 10 वर्षांपासून ठप्प पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आता शहरात धावू लागल्या आहेत. त्यासाठी 115 बस निवारे उभारण्याचे काम फास्ट-ट्रॅकवर आणण्याचे आणि कुणीही निवाऱ्यांना विरोध केल्यास एफआयआर दाखल करण्याचे आदेश आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कंत्राटदारास दिले आहेत.
परिवहन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्थायी समिती सभागृहात अधिकारी व कंत्राटदार यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी परिवहनचे सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, विभागप्रमुख विनोद केणे आदी उपस्थित होते.
या बैठकीत नियमाप्रमाणे बस निवारे निश्चित केलेल्या जागेवरच उभारणे, कुणाचा हस्तक्षेप खपवुन घेऊ नये, प्रवाशी निवारे उभारले असतील तर ते पुन्हा दुसऱ्या जागी हलवू नये, बस निवाऱ्यावर अनधिकृत होर्डिंग असतील तर ते त्वरित काढण्यात यावी.
होर्डिंग किंवा बस निवारे उभारताना विरोध करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात यावी, शहरात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वातानुकूलित बसेस शहाड रेल्वे स्टेशन पूर्व ते टिटवाळा रेल्वे स्टेशन पूर्व दरम्यान चालवण्यात यावी, बस गाडयांमध्ये नियमितपणे तिकीट तपासणी करण्यात यावी.
बस निवाऱ्या वरती जाहिराती बरोबर उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजनांच्या प्रसिद्धी देऊन जनजागृती करावी, दिव्यांग, महिला व वृद्ध यांच्या करीता तिकीट पासमध्ये सवलती देण्याबाबत तात्काळ विभागामार्फत प्रस्ताव प्रस्तावित करण्यात यावा. असे आदेश व सुचना आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी संबंधित अधिकारी,कर्मचारी तसेच कंत्राटदार यांना दिले आहेत.
'परिवहन सेवेचा प्रवास'
2009 साली उल्हासनगर परिवहन सेवेची सुरवात करण्यात आली होती.त्याचा कंत्राट केष्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे राजा गेमनानी याना देण्यात आला होता. गोरगरिबांची ही सेवा 2014 पर्यंत धावली होती. मात्र डिझेल, पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असताना वारंवार मागणी करूनही प्रवासी भाडेवाढ करून मिळत नसल्याने राजा गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता.
तेंव्हापासून बससेवा बंद पडली होती. मात्र तत्कालीन आयुक्त अजीज शेख, तत्कालीन मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी परिवहन विभागप्रमुख विनोद केणे यांना निविदा प्रक्रिया हाताळण्याचे आदेश दिले. त्याला प्रतिसाद मिळाला आणि पुण्याच्या कंपनीला कंत्राट मिळाला. अजीज शेख, अशोक नाईकवाडे यांनी पुण्यात जाऊन बसची पाहणी केल्यावर शहरात 10 बसेच आणि कल्याण ते बदलापूर या मार्गावर 5 वातानुकूलित बसेस धावू लागल्या आहेत.
उल्हासनगर, अंबरनाथ ते बदलापूर पर्यंत 115 प्रवासी बस निवारे उभारण्याच्या कामांना गती देण्यात येणार असून त्यापैकी 16 निवारे उभारण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त अजय साबळे, विभाग विनोद केणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.