11वी विशेष फेरीत 59 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश, अर्ज केलेले 9 हजार विद्यार्थी प्रवेशाविना

11वी विशेष फेरीत 59 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश, अर्ज केलेले 9 हजार विद्यार्थी प्रवेशाविना

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. या यादीनंतरही अर्ज केलेले सुमारे 8 हजार 856 विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. या यादीनंतर मुंबई विभागात सुमारे 89 हजार 44 जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष यादीत सर्व शाखांच्या मिळून एकूण 1 लाख 48 हजार 386 जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. या जागांसाठी 68 हजार 17 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी 59 हजार 322 विद्यार्थ्यांना विशेष फेरीत महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहेत. म्हणजे अर्ज  केलेल्या सुमारे 8 हजार 856 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 35 हजार 314 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. तिसऱ्या फेरीनंतर एक लाख 35 हजार 466 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या यादीत महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना आता कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

विशेष फेरीनंतर यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश

  • कला - 4,487
  • वाणिज्य - 35,423
  • विज्ञान - 18,819
  • एमसीव्हीसी - 593
  • एकूण - 59,322

काही महत्त्वाच्या महाविद्यालयांचे विशेष गुणवत्ता यादीचे कट ऑफ (500 पैकी गुण)
 

महाविद्यालय वाणिज्य कला विज्ञान
       
एचआर महाविद्यालय 455 - -
केसी महाविद्यालय  452 396 367
जय हिंद महाविद्यालय 452 422 368
रुईया महाविद्यालय - - 468
रुपारेल महाविद्यालय 457 431 451
साठ्ये महाविद्यालय 447 390 436
डहाणूकर महाविद्यालय 455 - -
भवन्स महाविद्यालय 438 399 433
मिठीबाई महाविद्यालय 455 441 383
एनएम महाविद्यालय 468 - -
वझे-केळकर महाविद्यालय - - 467

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

11th special round Admission 59 thousand students 9 thousand students without admission

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com