धक्कादायक! मुंबईत अवघ्या 14 दिवसात तब्बल 'इतक्या' इमारती सील..

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

मुंबईसह महाराष्ट्रात 3 जून पासून लॉकडाऊन शिथील होण्यास सुरवात झाली. तेव्हा पासून आतापर्यंत तब्बल 1 हजार 257 नव्या इमारती सिल झाल्या आहेत. 

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जून पासून लॉकडाऊन शिथील होण्यास सुरवात झाली. तेव्हा पासून आतापर्यंत तब्बल 1 हजार 257 नव्या इमारती सिल झाल्या आहेत. 

अंधेरी जोगेश्वरी परीसरातील सील केलेल्या इमारतीची संख्या गेल्या आठ दिवसात  दुप्पटी पेक्षा अधिक  झाली आहे. 9 जून रोजी के पुर्व विभागात 265 इमारती सील होत्या. तर 17 जून पर्यंत 535 इमारती सिल करण्यात आल्या आहेत. तर मालाड पी उत्तर विभागामधील सील केलेल्या इमारतींची संख्या 100 ने कमी झाली आहे. 9 जून रोजी येथे 300 इमारती सील होत्या तर आज 201 इमारती सील आहेत. तर कुलाबा,काळबादेवी,भायखळा, लालबाग, दादर माहिम या भागातील सिल केल्या इमारतींची संख्या घटली आहे .

हेही वाचा: MMRDA चं दुसरं कोविड रुग्णालय तयार; कोरोना रुग्णांना मिळतील 'या' सुविधा.. 

महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार 17 जून रोजी मुंबईतील 4 हजार 996 इमारती सील करण्यात आल्या आहेत.बी तर 3 जून रोजी ही संख्या 3 हजार 739 आणि 9 जून रोजी 4 हजार 538 होती.

सील झोपड्याही वाढल्या:  

3 जून रोजी मुंबईत 759 वस्त्या आणि चाळी सील होत्या, तर आज 833 वस्त्या आणि चाळी सील आहेत. यात बोरीवलीतील 128 आणि कुर्ला येथील 112 वस्त्या आणि चाळी सर्वाधिक आहेत.

हेही वाचा: बापरे! तब्बल 600 अभियंत्यांना 'या' कामांसाठी जुंपले; महापालिकेचे विकासकामांकडे दुर्लक्ष..

 

सर्वाधिक इमारती सील असलेले टॉप पाच विभाग: 

आर मध्य कांदिवली -- 416 

के पुर्व अंधेरी पुर्व -- 535 

एफ उत्तर दादर माटूंगा पुर्व शिव -- 530

पी दक्षिण गोरेगाव -- 300

के पश्चिम अंधेरी पश्चिम -- 260 

1257 buildings sealed in mumbai in 14 days 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1257 buildings sealed in mumbai in 14 days