चाकरमाने निघाले कोकणाला; मुंबई विभागातून 16 बस रवाना  तीन हजार प्रवाशांनी केले आरक्षण 

प्रशांत कांबळे
Thursday, 6 August 2020

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने 6 ते 12 ऑगस्टपर्यंत 400 बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथून या बस सुटणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत सुमारे 3 हजार प्रवाशांनी आरक्षण केले असून गुरूवारी 22 बस कोकणासाठी रवाना झाल्या आहे.  

मुंबई : कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने 6 ते 12 ऑगस्टपर्यंत 400 बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथून या बस सुटणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत सुमारे 3 हजार प्रवाशांनी आरक्षण केले असून गुरूवारी 22 बस कोकणासाठी रवाना झाल्या आहे.  

जेएनपीटीला शंभर कोटींचा फटका? विम्यामुळे भरपाई मिळणार; पाहणी अभ्यासनंतरही अधिकृत नुकसानीचा अंदाज नाही

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोषनेनंतर गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे सेवेला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. पावसामुळे बुधवारी मुंबई, ठाणे व पालघरमधून निघणाऱ्या 22 बस रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, गुरुवारी राजापूर, मालवण, देवगड,देवरुख, लांजा, गुहागर,खेड, दापोली, रत्नागिरी, चिपळूनसाठी या बस सोडण्यात आल्या. कोकणासाठी सर्वाधिक आरक्षण हे 10 ते 11 ऑगस्ट रोजीचे असल्याने या दोन दिवसांसाठी 150 बस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची संख्येनूसार बस फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

मुंबईतील नालेसफाईबाबत फडणवीस यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत 'ते' प्रकल्प पूर्ण करा नाहीतर परिस्थिती तशीच राहील

----------------------
मुंबई विभागात 16 बस फुल 
मुंबई विभागात गुरुवारी सकाळी 16 बसचे आरक्षण फुल झाले होते. यातील 6 बसचे गृप बुकिंग करण्यात आले. या 16 बस कोकणासाठी गुरुवारी रवाना झाल्या. तसेच, 100 बस मुंबई विभागात सज्ज आहे. 
-----------------
सुरक्षिततेचे आव्हान
प्रत्येक प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक करण्यात आले असून, सामाजिक अंतर ठेवून बसमध्ये केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. त्यासोबतच प्रवासाला निघण्यापुर्वी बस पुर्ण निर्जंतूक करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

---------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 buses left Mumbai division. Three thousand passengers made reservations