16 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलीवर ठेकेदाराने केला बलात्कार; पाली पोलिसांत गुन्हा दाखल

अमित गवळे
Saturday, 10 October 2020

पालीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे

पाली ः पालीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुरुवारी (ता. 8) रात्री साडेअकरा वाजता पाली पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात बलात्कार व ऍट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी ठेकेदाराचे नाव नितीन महादू पाटील (वय 34) असे आहे. तो मूळ राहणार पाली येथील असून डहाणू तालुक्‍यातील चरी गावठाण येथे राहणास आहे. त्याला अटक केली असल्याला पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले. 

भिवंडीत किरकोळ वादातून अँसिड हल्ला; पाच जण जखमी; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पीडित 16 वर्षीय आदिवासी मुलगी (मूळ राहणार पाली, सध्या रा. चरी गावठाण, ता. डहाणू) ही बिल्डिंग बांधकामावर मजुरीचे काम करत होती. तेथील ठेकेदार नितीन महादू पाटील याने 1 जानेवारी 2019 ते 6 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत आणि चरी गावठाण (ता. डहाणू) येथे बलात्कार करून जातिवाचक शिवीगाळ केली. यासंदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. याबाबत पीडितेने पाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 year old tribal gir wrong by contractor Filed a case with Pali police