Mumbai News : रील बनवण्याच्या नादात खोल विहिरीत पडला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

मुंब्रा येथे राहणार बिलाल साहिल शेख हा तरुण रविवारी ठाकुर्ली येथे मित्रांसोबत आला होता.
18 year old dies while making reel on social media in dombivli police
18 year old dies while making reel on social media in dombivli policesakal

डोंबिवली - ठाकुर्ली येथील पंप हाऊस जवळील खोल विहिरीत पडून 18 वर्षीय बिलाल शेख या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथून तो ठाकुर्ली येथे मित्रांसोबत रील बनविण्यासाठी आला होता. मात्र त्याचे हे रील वेड त्याच्या आयुष्याचा शेवट करणारे ठरले.

18 year old dies while making reel on social media in dombivli police
Atharva Sudame : युवा ‘कंटेट क्रिएटर’ अथर्व सुदामेचा सात लाख फॉलोअर्सचा अनोखा प्रवास

मुंब्रा येथे राहणार बिलाल साहिल शेख हा तरुण रविवारी ठाकुर्ली येथे मित्रांसोबत आला होता. पंप हाऊस जवळ रील बनवत असताना बिलाल हा खोल विहिरीत पडला. बिलाल पडल्याने मित्रांनी आरडा ओरडा केला पण आजूबाजूला कोणीच नव्हते. बाजूला रेल्वे सुरक्षा बलाकडे धाव घेत बिलाल विहिरीत पडल्याचे सांगितले.

18 year old dies while making reel on social media in dombivli police
Mumbai Crime : कर्ज फेडण्यासाठी  त्याने निवडला चोरीचा मार्ग...हाती पडल्या बेड्या

रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडील अग्निशामक दलास माहिती दिली. स्थानक अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले. अखेर 32 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सोमवारी सायंकाळी बिलाला याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात यश आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com