मुंबईतील नायर रुग्णालयात 19 जणांना दिला गेला कोविशील्ड लसीचा डोस

भाग्यश्री भुवड
Thursday, 1 October 2020

मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुरू झाली आहे.

मुंबई , 01 : मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुरू झाली आहे. सोमवारपासून नायर रुग्णालयातही कोव्हिशिल्ड लसीचा डोस द्यायला सुरुवात झाली. त्यानुसार, आतापर्यंत 19 जणांना ही लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्याने ही लस 100 जणांना देण्यात येणार आहे. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीची चाचणी मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयामध्ये करण्यात येत आहे. केईएम आणि नायरमध्ये पहिल्या दिवशी अवघ्या तीन जणांना या लसीचा डोस देण्यात आला होता. 

महत्त्वाची बातमी लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी बनवून द्यायचा बनावट QR कोड पास, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

नायर रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लशीची चाचणी 100 जणांवर करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून स्वयंसेवकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 150 स्वयंसेवकांनी चाचणी करण्यासाठी नोंद केली आहे. यातील 100 जणांची आरटी-पीसीआर आणि अ‍ॅण्टिबॉडीज चाचणी करून त्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांची पुन्हा महिन्यांनतर तपासणी करून येणार्‍या निष्कर्षावरून पुढील प्रक्रिया निश्चित केले जाईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

covishield vaccine testing total 19 people are given vaccine in nair so far


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 healthy people were given covishield vaccine at nair hospital mumbai