मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; 2 ठार

प्रवीण चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

तलासरी : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील तलासरी तालुक्यातील वडोली हद्दीत शिवम ऑटो शोरूमसमोर गुजरात वाहिनीवरून मुंबईकडे जात असलेल्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी उभा असणाऱ्या दुचाकीला धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात वडोली येथील दुचाकीस्वार चिंतामण धोधडे (वय 30) आणि मागे बसलेली रामी डोंगरकर (वय 55)  यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

महामार्गावर शिवम ओटो शोरूमच्या समोर शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महामार्ग क्रॉसिंगसाठी उभा असलेल्या दुचाकीस्वाराला महिंद्रा XUV(एमएच 06 बीए 9190) गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार (एमएच 48 एबी 6510) चिंतामण सोनू धोधडे आणि रामी सनत्या डोंगरकर यांचा जागीच मृत्यू झाला. 

हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार आणि दुचाकी 100 ते 150 फूट लांब फेकले गेले आणि दुचाकीचे दोन तुकडे झाले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीवर मुंबईकडे जाताना महिंद्रा XUV गाडी भरधाव जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. ही गाडी भिंवडी निजामपूर महानगरपालिकेतील नगर सेविकेची असल्याचे गाडीवर लावलेल्या स्टिकर्सवरून सांगण्यात येत आहे. या अपघाताची नोंद तलासरी पोलिस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.    

मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी पोलिस हद्दीच्या धुंदलवाडी ते अच्छाड या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनावश्यक ठिकाणी वळण, कमी उंचीचे डिव्हायडर, वेग मर्यादा नियंत्रण बोर्ड नसणे, वाहतूक पोलिसांची निष्क्रियता, देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आय आर बी कंपनीचे दुलक्ष, वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन इत्यादी अनेक कारणांनी अपघातात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे वडोली आणि अच्छाड येथे उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि 'आयआरबी'च्या अधिकरी वर्गाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयआरबी कंपनी महामार्गावर आणखी किती निष्पाप लोकांचा जीव घेणार आहेत असा प्रश्न केला.  
 
Web Title: 2 die in accident on mumbai ahmedabad highway