मुंबईकरांच्या पाण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय, समुद्राचे पाणी करणार गोडे

समीर सुर्वे
Thursday, 4 February 2021

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महानगर पालिका उभारणार आहे. सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महानगर पालिका उभारणार आहे. सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची क्षमता 400 दक्षलक्ष लीटर इतकी असेल. यासाठी हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.

पावसाचे बदलते वेळापत्रक लक्षात घेता नवे स्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा मागवण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले. मध्य वैतरणा धरणात तरंगते सौरऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातून 100 मेगावॅट वीज निर्माण केली जाणार आहे. ही वीज जलप्रकल्पांसह समुद्रातील पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पातही वापरले जाणार आहे. 

उत्पन्नवाढीसाठी एकच प्राधिकरण

मुंबईत सध्या 24 प्रभाग आहेत. त्यांची संख्या आता 25 होणार आहे. मालाड येथील पी उत्तर प्रभागाचे विभाजन करून त्या ठिकाणी पी पूर्व आणि पी पश्‍चिम असे दोन प्रभाग तयार कररण्यात येणार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. तसेच के पूर्व अंधेरी-जोगेश्‍वरी पूर्व आणि एल कुर्ला प्रभागाच्या विभाजनाचाही विचार आहे. 

हेही वाचा- मुंबईत हवेचे वाढते प्रदूषण; अंधेरी, नवी मुंबईत हवा अतिशय वाईट

प्रकल्पग्रस्तांना पैसा

माहुल येथे स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांचा वाद निर्माण झाल्यामुळे त्यातून पालिकेने आता धडा घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घर देण्यात येईल. हे घर मान्य नसेल तर त्यांना बाजारभावाने रक्कम देण्यात येणार आहे. तसा निर्णयही या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मालमत्ता करात घट दिसत असली तरी ती नंतर वसूल होणार आहे. उत्पन्नवाढीसाठी नवे पर्याय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत, तसेच मुंबईत एकाच प्राधिकरणाची गरज असून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आस्थापना खर्चात कपात करून प्रकल्पांवरील खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचा विकास थांबणार नाही.
इक्‍बाल सिंह चहल, मुंबई पालिका आयुक्त

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

200 million liter Sea water desalination project by bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 million liter Sea water desalination project by bmc