मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

मुंबई - देशभरात कोरोनानं थैमान घातल आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता देशात चौथा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले. तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात मजुरांना आपआपल्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. याच पार्श्वभूमीवर आता या सर्व मजुरांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होईल. तसंच त्याची संख्या हळूहळू वाढवली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. याबाबतची माहिती लवकरच देऊ, असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. 

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातली सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात मजूर, कामगार, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यात अडकले होते. त्या काळात फक्त माल वाहतूक सुरू ठेवली होती. नंतर मजुरांना आपल्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. 

जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहनही रेल्वेमंत्र्यांकडून राज्य सरकारांना करण्यात आलं आहे. 

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी मजुरांना आवाहन देखील केलं आहे. तुम्ही आहे तिथेच थांबा. जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपल्या घरी लवकरच जाता येईल. त्यांनी काळजी करु नये, असं गोयल यांनी म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजुरांना सहकार्य करावं. त्यांच्या जवळ असलेल्या मेनलाइन स्टेशनजवळ नोंदणी सुरु करावी. त्याची यादी रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरुन त्यानुसार रेल्वे श्रमिक स्पेशल ट्रेन चालवता येऊ शकेल, असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या 

  • भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर लॉग इन करा. 
  • वेबसाईटवर तुम्हाला LOGIN चा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्यात यूझर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरा. एखाद्याच IRCTC वर लॉगइन आयडी नसेल तर REGISTER ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, नाव ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा लागेल. 
  • ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही Book Your Ticket लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आवश्यक अशी माहिती तुम्हाला टाकावी लागेल. तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. From च्या पर्यायावर तुम्ही जेथून प्रवास करणार ते ठिकाण आणि To च्या पर्यायावर ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण भरा. यानंतर तारीख सिलेक्ट करून Find Trains वर क्लिक करा.
  • तुम्ही भरलेल्या दोन्ही स्थानकांदरम्यान असलेल्या सर्व स्पेशल ट्रेनची यादी तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर Check Availability & Fare चा पर्याय दिसेल. तिथेच तुम्हाला स्लिपर क्लास, एसी 3 टायर, एसी 2 टायर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एग्जिक्युटिव्ह चेअर असे पर्याय दिसतील. Check Availability & Fare वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे तिकिट उपलब्ध आहे ते दिसेल. 
  • ज्या ट्रेनचे तिकिट तुम्हाला बुक करायचे आहे, त्यावर सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. 
  • बुक नाऊवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव, वय, लिंग, मोबाइल नंबरसह इतर माहिती त्यात भरा आणि Continue Booking वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय असलेली विंडो ओपन होईल. यात रेल्वेनं तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग किंवा मोबाइल वॉलेटच्या मदतीनं पेमेंट करण्याचा पर्याय दिला आहे. तुमच्या सोयीनुसार ते पेमेंट तुम्ही करु शकता. 
  • पेमेंट झाल्यानंतर तुमचे तिकिट बुक होईल. तिकिट बुक झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तिकिट बुक झाल्यानंतर प्रिंटचा पर्यायही येतो.

200 non ac trains will run from 1st june read full news about piyush goyals announcement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com