esakal | निजामुद्दीन घटनेमुळे कोकणवासीयांच्या चिंतेत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

निजामुद्दीन घटनेमुळे कोकणवासीयांच्या चिंतेत वाढ
  • "तबलिगी'त कोकणातील 200 जण 
  • विभागीय आयुक्तांचे खबरदारीचे आदेश 

निजामुद्दीन घटनेमुळे कोकणवासीयांच्या चिंतेत वाढ

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील तब्बल 200 नागरिक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी या नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यापैकी काही जणांचा शोध लागल्याने त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

निजामुद्दीन येथे तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी कोकण विभागातील 200 जणांची यादी कोकण विभागीय प्रशासनास प्राप्त झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील 139, रायगड जिल्ह्यातील 42, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन, पालघर जिल्ह्यातील 16 जणांचा समावेश असल्याची माहिती शिवाजी दौंड यांनी दिली. प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील काही लोक बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. उर्वरित नागरिकांचा तपास जलद गतीने सुरू आहे. निजामुद्दीन येथील तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्याच्या धर्तीवर कोकण विभागात होणारे सर्व मोठे समारंभ रद्द करण्याच्या सूचना दौंड यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

नवी मुंबईकरांसाठी धोक्‍याची घंटा 
निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात नवी मुंबई शहरात वास्तव्यास असणारे नागरिक सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. या सर्व नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी प्रशासनाला दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

"200 people from Konkan in Tabligi."

loading image