esakal | मुंबईत सहा तासात 214.35 मिमी पावसाचा नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-rains

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या के पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात 214.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

मुंबईत सहा तासात 214.35 मिमी पावसाचा नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या के पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात 214.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे 168.15 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल वडाळा परिसरात 158.97, धारावी परिसरात 148.58, रावळी कॅम्प परिसरात 139.2 एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभागात 113.78 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे‌. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण 69.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक म्हणजे 184.17 मिलिमीटर पावसाची नोंद विक्रोळी परिसरात झाली आहे. या खालोखाल कुर्ला परिसरात 147.84 मिलिमीटर, भांडुप परिसराचा समावेश असणाऱ्या एस विभागात 144.02 मीमी,  चेंबूर परिसरात 132.07, तर घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एन विभागामध्ये 124.95 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व परिसरात 214.35 मिलीमीटर, के पश्चिम विभागात म्हणजेच प्रमुख्याने अंधेरी पश्चिम परिसरात 200.17 मिलिमीटर, मरोळ परिसरात 183.38, विलेपार्ले 182.87, तर कांदिवली परिसरात 170.67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

loading image
go to top