Mumbai News : 22000 अधिक दहशवाद्यांची माहिती संकलित! ‘एनआयए’चा नवा डेटाबेस तयार

देशभरात तसेच परदेशात सक्रिय असलेल्या 22000 अधिक दहशतवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने नुकतीच संकलित केली आहे.
22000 more terrorist information collected new database of nia prepared
22000 more terrorist information collected new database of nia preparedSakal

Mumbai News : देशभरात तसेच परदेशात सक्रिय असलेल्या 22000 अधिक दहशतवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने नुकतीच संकलित केली आहे. अमेरिकेने तयार केलेल्या ‘ग्लोबल टेररिझम डेटाबेस’च्या धर्तीवर राष्ट्रीय दहशतवाद माहिती संकलन आणि विश्लेषण एमटीडीसी-फॅक नामक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध देशात दाखल झालेल्या हजारो गुन्ह्यांची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. एनआयएने 15 वर्षांनंतर असा डेटाबेस तयार केला आहे.

माहितीचे संकलन

देशात बंदी असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांची माहितीही त्यांच्या म्होरक्यांसह उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या वर्षांत राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोरदार कारवाई करीत तब्बल 625 दहशतवाद्यांना अटक केली आहे.

आतापर्यंत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या सर्वच दहशतवाद्यांची माहिती आणि त्यांच्या संघटनेचे नाव, बोटांचे ठसे, ध्वनिचित्रफित, छायाचित्रे तसेच समाजमाध्यमांवरील प्रोफाईल आदी सर्वच तपशील संकलित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एनआयएकडे दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या 92 लाख संशियतांच्या बोटांचे ठसे आहेत. याशिवाय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 5 लाखांहून अधिक आरोपींची माहितीही त्यांच्या अलीकडील छायाचित्रांसह संकलित करण्यात आली आहे.

यंत्रणांमध्ये ताळमेळ

दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करणाऱ्या संशयितांबाबतही संपूर्ण तपशील आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीसीटीव्हीवरील छायाचित्रावरून आरोपीला ओळखण्याचे तंत्रही विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यांतील दहशतवादविरोधी पथकांनाही त्यामुळे माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने त्या-त्या राज्यातील दहशतवादी कारवायांची माहिती संकलित केली आहे. या मुळे राष्ट्रीय आणि प्रत्येक राज्यातील तपास यंत्रणांमध्ये ताळमेळ वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com