esakal | तरुणाला स्टेम सेल डोनरची गरज, तुमच्या एका निर्णयामुळे जीव वाचू शकतो
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाला स्टेम सेल डोनरची गरज, तुमच्या एका निर्णयामुळे जीव वाचू शकतो

तरुणाला स्टेम सेल डोनरची गरज, तुमच्या एका निर्णयामुळे जीव वाचू शकतो

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुंबईतील एका सर्वसामान्या 29 वर्षीय तरुण ब्लड कॅन्सर या रोगाविरोधात लढत आहे. एखाद्याला ब्लड कॅन्सर झाल्यानंतर त्याच्याकडे ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय राहत नाही. ब्लड सेल ट्रान्सुप्लांट केल्यानंतर अशा रुग्णांना नवजीवन मिळू शकते. मुंबईतील २९ वर्षीय विपुल या तरुणाला ब्लड कॅन्सरमधील मायलोफायब्रोसिस नावाचा दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. अभिनेत्री किरण खेर यांनाही याच रोगाने ग्रासलं आहे. किरण खेर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विपुल याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, यासाठी तुमची गरज लागत आहे. विपुलला आताच्या घडीला ब्लड स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज असल्याची माहिती मिळाली आहे.

विपुलला झालेला ब्लड कॅन्सर दुर्मिळ असून, यामुळे शरीरात रक्त तयार करण्याची प्रक्रिया प्रभावित होते. त्यामुळे ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट करणे आवश्यक आहे. विपुलला स्टेम सेल डोनर मिळण्यासाठी व्हर्चुअल पद्धतीने एक अभियान चालवले जात आहे. अशा प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णांना मदत मिळण्यासाठी डीकेएमएस बीएमएसटी फाऊंडेशन ऑफ इंडिया नावाची संघटना काम करते. या संस्थेकडून हे अभियान चालवले जात आहे. यामध्ये आपण नोंदणी करून एखाद्याच्या जीवाचे रक्षण करू शकतो. www.dkms-bmst.org/Vipul या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करुन स्टेम सेलर होऊन तुम्ही विपुलचा जीव वाचवू शकता.

वेल्लोर येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये विपुलवर उपचार सुरू आहेत. विपुलवर उपचार करणारे डॉ. बीजू जॉर्ज यांनी सांगितले की, विपुलची प्रकृती गंभीर असून, त्याचा वाचवण्यासाठी मॅचिंग डोनर मिळणे अतिशय गरजेचे आहे. विपुलची एका बहिणीचे ५/१० एचएलए मॅच होत आहे. मात्र, विपुलच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीचा परफेक्ट मॅच होत नाही. त्यामुळे विपुलसाठी आता अन्य डोनरच्या शोधात आहे. ग्लोबल डेटाबेसमध्येही याबाबत शोध घेण्यात आला. मात्र, परफेक्ट मॅच मिळाला नाही. त्यामुळे डोनर शोधणे कठीण जात आहे. म्हणूनच भारतीय ब्लड स्टेम सेल डोनर यांनी अधिकाधिक प्रमाणात नोंदणी करावी आणि विपुलसारख्या तरुणाचे प्राण वाचवावे, असे ते म्हणाले.

ब्लड कॅन्सर कसा होतो?

जर शरीरात बराच काळ संसर्ग(infection) झाले असल्यास, रक्त कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (immune system) कमकुवत असल्यास त्याला ब्लड कॅन्सर होऊ शकतो. एचआयव्ही(HIV) आणि एड्स(AIDS) सारखे संक्रमण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, आणि त्यानंतर ब्लड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. इतर प्रकारच्या कर्करोगाचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रेडिएशन थेरपीच्या उच्च डोसमुळे रक्ताचा कर्करोग(Blood Cancer)होऊ शकतो. ब्लड कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. आणि ब्लड कॅन्सर हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ब्लड कॅन्सर होताच कर्करोगाच्या पेशी शरीरात रक्त न बनवण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे शरीराला रक्ताची कमतरता भासते.

नेमकं काय आहे मल्टिपल मायलोमा

Multiple myeloma हा ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे. हा आजार फार दुर्मिळ असून तो फार कमी जणांमध्ये पाहायला मिळतो. या कर्करोगामुळे शरीरातील प्लाज्मा पेशींवर त्याचा थेट परिणाम होतो. भारतात या कर्करोगाचे फार कमी रुग्ण आढळून येतात. असं म्हटलं जातं की, दरवर्षी जागतिक स्तरावर जवळपास ५० हजार नागरिकांमध्ये या कर्करोगाची लक्षणं आढळून येतात. शरीरातील चांगल्या प्लाज्मा पेशी संक्रमण आणि विषाणू यांच्याशी लढून अॅटीबॉडीज तयार करण्यासाठी मदत करतात. परंतु, मायलोमा कर्करोगामध्ये प्रभावित झालेल्या पेशी चांगल्या पेशींवर आक्रमण करतात.

कशामुळे होतो मल्टीपल मायलोमा?

हा कर्करोग विषारी रसायने, रेडिएशन, व्हायरल किंवा विषाणूचा संसर्ग, विकार, अनुवंशिक यामुळे हा आजार होऊ शकतो.

मल्टीपल मायलोमाचा शरीरावर कसा परिणाम होतो?

मल्टीपल मायलोमाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे शरीरातील एम प्रोटीनचं प्राण वाढणं. यात असामान्य, घातक पेशींमुळे चांगल्या पेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सतत संसर्ग होणे, रक्ताचे विकार, हाड्यांविषयक समस्या,एनिमिया, प्रचंड रक्तस्राव यासारख्या समस्या जाणवतात.

मल्टीपल मायलोमाची लक्षणे कोणती?

१. हाडांमध्ये तीव्र वेदना होणे

२. भ्रम

३. सतत संसर्ग होणे.

४. वजन कमी होणे.

५. जेवतांना त्रास होणे.

६. सतत तहान लागणे, शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे.

७. थकवा

८. पायातील ताकद कमी होणे.

९. लहान-सहान दुखापती होणे.

१०. पोटाचे विकार

उपचार -

मल्टीपल मायलोमा हा कर्करोग झाला असेल तर त्याचं निदान व्हायला वेळ लागतो. सुरुवातीच्या काही टेस्ट केल्यावर तो लगेच लक्षात येत नाही. परंतु, उशीरा निदान झाल्यामुळेही पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यात ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, बोन मॅरो बायोप्सी, इमेजिंग, स्कॅनिंग, एक्स-रे अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. परंतु, मायलोमा याच्यावरील ठोस उपचार अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र, यात स्टेम सेल थेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ट्रायल आणि थेरपी ट्रिटमेंट प्लान्स असे काही बेसिक उपचार केले जातात, असं सांगण्यात येतं.

loading image