लोकल ट्रेनमध्ये बेकादेशीर प्रवास करत असाल तर सावधान! तिकिट तपासणीसांची दंडात्मक कारवाई सुरू

प्रशांत कांबळे
Friday, 28 August 2020

राज्य सरकारने परवानगी दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच आपले ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करण्याचे प्रकार घडत असल्याने, तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये 291 केसेस दाखल करण्यात आल्या आहे.

मुंबई  - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारने परवानगी दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच आपले ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करण्याचे प्रकार घडत असल्याने, तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये 291 केसेस दाखल करण्यात आल्या आहे.

 अजित पवारांनी GST परिषदेत केंद्राकडे केली 'ही' मागणी, म्हणालेत थकबाकी वाढत राहिल्यास 1 लाख कोटींवर जाईल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अनियमित प्रवास करणा-या प्रवाशांविरूद्ध तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. उत्तरेतून मुंबईला परतण्यासाठी अप गाड्यांमध्ये प्रवासी विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र तयार करून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामूळे मुंबई विभागाच्या एका आठवड्याच्या मोहिमेदरम्यान तब्बल 291 प्रकरणे दाखल करून 3.82 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

कोव्हिडमुळे गारगाई प्रकल्प लांबणीवर; मुंबईकरांना आणखी काही काळ पहावी लागणार वाट

मोहीमे दरम्यान मुख्यत: लक्षात आलेल्या अनियमितता 

  • -  ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर,  
  • - बदललेल्या तिकिटांवर प्रवास करणे,  
  • - सिस्टम व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये चुकीचे रूपांतरण,  
  • - तिकिटांच्या रंगीत झेरॉक्ससह प्रवास,  
  • - बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास, 
  • - तिकिटांच्या हस्तांतरणाचे प्रकरण आढळले.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 291 cases of illegal travel on Central Railway line launched ticket inspection drive