अरे बापरे...! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

30 members of the same family infected with corona in Kalyan
30 members of the same family infected with corona in Kalyan

कल्याण : देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना, गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील तब्बल 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील एका व्यापाऱ्याच्या कुटुंबात हा प्रकार घडला असून, हे रुग्ण दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकूण 33 हजार 839 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 672 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्‍चिमेतील ज्या कुटुंबात रुग्ण आढळले आहेत, त्यांनी एकत्रितपणे गणपती आरती केली होती. या आरतीत कल्याणबाहेरील काही नातेवाईक सहभागी झाले होते. त्यानंतर घरातील एकूण 33 जणांची कोरणा चाचणी केली. यात 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. कुटुंबातील 13 सदस्यांना एका रुग्णालयात तर उर्वरित 17 जणांना अन्यत्र उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

क्लिक करा : ठाण्यात अवतरलाय 'ट्री मॅन'! घरातच केले तब्बल पावणेतीनशे रोपांची जोपासना

गणेशोत्सव काळात सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. मात्र, घरोघरी साजऱ्या झालेल्या उत्सवात याच नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. गणेशोत्सवानंतर एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य कोरोनाग्रस्त झाल्याचे प्रमाण वाढत असल्याची माहितीही कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
 

सार्वजनिक ठिकाणी वावरताना सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. मात्र खासगीरित्या घरात साजरे झालेले उत्सव याच नियमानुसार योग्य ते अंतर राखून साजरे करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. प्रत्यक्षात ही काळजी घेतली न गेल्याने गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील
वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी 

----------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com