esakal | Mumbai | महापालिका म्हाडा वसाहतींत ३०० कोटी खर्च करणार
sakal

बोलून बातमी शोधा

mhada

मुंबई : महापालिका म्हाडा वसाहतींत ३०० कोटी खर्च करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेने एक हजार १०० कोटींच्या निविदा जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एक हजार कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील ३०० कोटी रुपयांची रस्तेदुरुस्ती म्हाडा वसाहतींमध्ये होणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर दरवेळी रस्ते दुरुस्तीवर हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यानुसार यंदाही महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. १२०० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदेतील अंदाजित खर्चापेक्षा ३० टक्के कमी खर्चाने कामे करण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवली होती. त्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने या निविदा रद्द केल्या. त्यामुळे आता फेरनिविदा मागवल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात महापालिकेने एक हजार १०० कोटी रुपयांच्या मूल्याच्या निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एक हजार कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरच मुंबईतील नागरिकांना चांगले रस्ते मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध; तेजस ठाकरे यांचा सहभाग

पालिकेवर जबाबदारी ३०० कोटी रुपयांची दुरुस्ती म्हाडा वसाहतीतील रस्त्यांची होणार आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये म्हाडा वसाहतीतील नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी म्हाडाला दिली होती. त्यामुळे प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत पेच निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने पुन्हा प्राथमिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी पुन्हा पालिकेवर सोपवण्यात आली. त्यामुळे पालिकेने आता या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. म्हाडा वसाहतींचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या सोडवणुकीची गरज आहेच, पण या निर्णयामुळे म्हाडा वसाहतीत रस्ते चांगले झाले तर नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत म्हाडाच्या अनेक वसाहती असून या वसाहतीतील नागरिकांचा रस्त्यांचा त्रास यामुळे कमी होईल, अशी आशा आहे.

loading image
go to top