शिवस्मारकाच्या पूजनासाठी 36 जिल्ह्यांतले पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

आमदार जलकलश, माती घेऊन मुंबईत दाखल होणार
मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ता. 24 डिसेंबर रोजी नियोजित असतानाच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून पवित्र माती, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जलकलश मुंबईतील चेंबूरमध्ये पोचणार आहेत.

जिल्ह्याजिल्ह्यांतील आमदार, लोकप्रतिनिधी माती आणि जलकलश घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत.

आमदार जलकलश, माती घेऊन मुंबईत दाखल होणार
मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ता. 24 डिसेंबर रोजी नियोजित असतानाच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून पवित्र माती, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जलकलश मुंबईतील चेंबूरमध्ये पोचणार आहेत.

जिल्ह्याजिल्ह्यांतील आमदार, लोकप्रतिनिधी माती आणि जलकलश घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत.

चेंबूरच्या परिसरात या कलशांचे स्वागत होईल, त्यानंतर संपूर्ण मुंबईत या कलशांची मोटरसायकलवरून यात्रा निघणार असून सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या विस्तीर्ण मंचावर या कलशांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकार करतील. या भूमिपूजन समारंभात हे सर्व कलश पंतप्रधानांना दिले जाणार आहेत. स्मारकाच्या जागी या कलशांची माती टाकत संपूर्ण महाराष्ट्र या स्मारकाच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र निर्माण केले जाईल.

महाराष्ट्रात उभे राहणारे स्मारक जगात सर्वांत उंच असेल. त्यासाठी संपूर्ण राज्याने सहभागी व्हावे, असा जोरदार प्रयत्न भाजप सरकारतर्फे केला जातो आहे. जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांनंतर आता मुंबई ढवळून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्या कलशांची मिरवणूक मुंबईतील गेट-वेकडे सरकतील तेव्हा महत्त्वाच्या चौकात शिवचरित्रातील प्रसंग देखाव्याच्या रूपात उभारले जाणार आहेत. या मार्गावरून जी मिरवणूक निघेल तेथे हजारोंच्या संख्येने उभे राहावे, असे प्रयत्न केले जाणार आहेत.

24ला गिरगाव चौपाटीवर जो कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, तसेच त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे आणि कोल्हापूर संस्थानचे राजे संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. या वेळी मंचाशेजारी राजघराण्यातील, तसेच सरदार कुळातील विशेष निमंत्रितांसाठी शामियाना बांधण्यात येणार आहे.

समुद्रात हा कार्यक्रम ओहोटीच्या वेळी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी योग्य वेळ निश्‍चित करण्यात आली असून लगतच्या खडकावर मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. छत्रपतींच्या राज्याभिषेकप्रसंगी जे मंत्रपठण झाले होते तेच या वेळी उच्चारले जाईल. पंतप्रधानांना सागरी प्रवासात सुरक्षाकवच देताना महाराजांच्या काळातील आरमाराचे देखावे उभे केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 district water to shivsmarak poojan