esakal | 'ताप' वाढला! कोरोनासह तापानं ४ जणांचा मृत्यू; घाटकोपरमध्ये भीतीचं वातावरण..
sakal

बोलून बातमी शोधा

fever

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मात्र आता कोरोनासह अजून एका भयंकर आजारानं मुंबईकरांची झोप उडवली आहे. या आजारामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे अशी धक्कादायक माहिती समोर अली आहे. 

'ताप' वाढला! कोरोनासह तापानं ४ जणांचा मृत्यू; घाटकोपरमध्ये भीतीचं वातावरण..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मात्र आता कोरोनासह अजून एका भयंकर आजारानं मुंबईकरांची झोप उडवली आहे. या आजारामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे अशी धक्कादायक माहिती समोर अली आहे. 

घाटकोपरमध्ये कोरोनासोबत आता तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कोरोना आणि तापाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. मृतांची संख्या वाढू लागल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा: बाप रे! खासगी डॉक्टर आता 'या' गोष्टीसाठी देतायत नकार; कोरोनाच्या टेस्टसाठी संशयितांची फरफट. 

घाटकोपरच्या पूर्व आणि पश्चिमेचा बहुतांश झोपडपट्ट्यांनी व्यापला आहे. गेल्या महिन्याभरापासून या भागात कोरोनाचा झपाट्याने फ़ैलाव सुरू आहे. त्यात भरीस भर म्हणून तापाची साथ सुरू झाली आहे. तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र त्यामुळे हा ताप कोरोनाचा की विषमज्वर यामुळे आरोग्य खात्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आणि तापामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. या भागातील राजावाडी रुग्णालय कोरोनाच्या रुगणांनी फुल्ल झाले आहे. 

झोपडपट्ट्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. घाटकोपरच्या पूर्व भागात कामराज नगर, रमाबाई कॉलनी या भागावर कोरोना वाढला आहे. घाटकोपरच्या पश्चिम भागात भीमनगर, इंदिरानगर, असल्फा व्हिलेज, रामनगर, चिरागनगर, विक्रोळी पार्कसाईट या भागात कोरोनाचा वाढत आहे. 

हेही वाचा: कुणी घर देतं का घर? मुंबईत भाडेकरु नवीन घराच्या शोधात; वाचा काय आहे कारण 

कोरोना बाधितांना विक्रोळी पार्कसाईट आणि चिरागनगर येथील केंद्रात क्वारंटाईन केले जात आहे. मात्र घाटकोपरमधील कोरोनाचा बाधित क्षेत्रात धूर फवारणी किंवा औषध फवारणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

4 people have no more due to fever in ghatkopar read full story 

loading image
go to top