राज्यात मे अखेर जैविक कचऱ्यात 45 टक्के वाढ;  एमपीसीबीचा अभ्यास; कोव्हिडचा परिणाम झाल्याचे स्पष्ट 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 8 September 2020

कोव्हिड पूर्वच्या तुलनेत मे महिन्याअखेर राज्यात 45 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जैविक कचरा तयार झाला आहे

मुंबई : कोव्हिड पूर्वच्या तुलनेत मे महिन्याअखेर राज्यात 45 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जैविक कचरा तयार झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे. जैविक कचऱ्याची 21 मार्च ते 1 जून दरम्यान तुलना केली आहे. 
"पर्यावरणीय गुणधर्मांवर कोव्हिड परिणाम' असा अभ्यास एमपीसीबीने सुरू केला होता. राज्यभरातील 6 हजार 410 आरोग्य संस्थांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. 

तर कंगना रानौतला व्हावे लागणार क्वारंटाईन! वाचा मुंबईच्या महापौरांची प्रतिक्रीया

गेल्या वर्षी सरासरी 62.4 टन जैविक कचरा तयार झाला होता. या वर्षाच्या मे अखेर वाढून दर दिवशी 90.6 टन झाला आहे, असे या अभ्यासात दिसून आले आहे. एमपीसीबीच्या मते, राज्यात 31 जैविक कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट सुविधा आहेत. 
या अभ्यासातून राज्यभरातील शहरी स्थानिक संस्थांमधून निर्माण होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यात थोडीशी घसरण झाली असल्याचे समोर आले आहे. विशेषत: एप्रिलमध्ये बांधकाम आणि व्यावसायिक कचऱ्याचे प्रमाण नगण्य आहे. 
कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यामागे दोन मुख्य कारणे असू शकतात. एक म्हणजे मुंबईतील अनेक सार्वजनिक 
ठिकाणे बंद आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मुंबईतून स्थलांतरण झालेले आहे. त्यामुळे कचरा जमा होण्याचे प्रमाण कमी झाले असेल असे या अहवालात म्हटले आहे. 

दीपक कोचर यांना सक्तवसूली संचलनालयाने केली अटक; दुपारपासून सुरू होती चौकशी

मे महिन्यामध्ये किंवा लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पॅकेजिंग संबंधित कचऱ्यामध्येही अभ्यासानुसार वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑनलाईन व्यवहाराद्वारे घरपोच साहित्य परवानगी देण्यात आली. त्यामुळे अशा कचऱ्यात वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 per cent increase in organic waste in the state by the end of May MPCB ​​study Clearly the result of covid